नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 2 April 2011

जादुई बटवा

नेहेमीच प्रेमाची फळे गोमटी नसतात. किंवा सगळ्याच प्रेमाची फळे काही गोमटी नसतात. आणि खरं तर प्रेमप्राप्तीसाठी त्याग असतो. मेहेनत असते. आणि समजा हे प्रेम प्राप्त झालेच तर ते वाढते राहावे, त्याला काही बाधा येऊ नये म्हणून त्याची जोपासना करावी लागते. डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. जसे गुलबकावलीचे फुल मिळावे म्हणून मेहेनत व गवसले की ते सतत टवटवीत राहावे यासाठी त्याची निगराणी.

ह्या लेखनप्रवासाला तुम्हां सर्वांचे प्रेम लाभले ह्याचे मला अप्रूप. त्या प्रेमाने मग हलकेच नेऊन सोडले अथांग आकाशात. पाठीराख्यांचा एकेक आकडा जशी एक एक चांदणी. वेचत गेले. निघाले तेव्हा हातात चिमुकला बटवा होता...नव्हतं माहित....तो होता जादूचा. एकेक चांदणी जशी आत शिरत गेली, जादुई बटवा वाढता झाला.

ह्या धुंद प्रवासात काही बक्षिसे मिळाली...त्या बक्षिसांवर अधिकार कोणाचा?
तुम्हीं दिले...मी फक्त राखले...हळूहळू वृद्धिंगत झाले.
माझा चांदण्यांचा हार. एकेक चांदणी हळुवार ठेवणीत बसवलेली.

...ह्याबद्दल मी ऋणी...हे ऋण कधीही संपू नये असे...ओझे नसलेले ऋण...
स्टार माझा ब्लॉग माझा...

मी मराठी लेखनस्पर्धा २०११

27 comments:

rajiv said...

ह्या जादू-ई-बटव्याचे उत्तरोत्तर जादू-ई-चटईत रुपांतर होऊ दे .पाठ राखायला व शाबासकी द्यायला आम्ही आहोतच, आकाशातील आपला प्रवास अभिमानाने बघत !!

Raj said...

हार्दिक अभिनंदन. आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. :)

श्रीराज said...

अनघा, मला अभिमान वाटतो तुझा!!! :)

Meaning of "Real-Life" said...

हार्दिक अभिनंदन,
तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत .तुमची भाषा शैली मला खूप आवडते,असेच लिहित रहा ...

Ram said...

हार्दीक अभिन'दन.

अनघा said...

आभार राजीव. :)

अनघा said...

राज, मनापासून आभार...
:)

अनघा said...

श्रीराज बुवा, सुरुवातीपासून आहात आपण माझ्या ह्या प्रवासात...
आभार! नेहेमीच पाठिंबा दिल्याबद्दल. :)

अनघा said...

संजय, धन्यवाद! दाद नेहेमीच नवे बळ देऊन जाते.... :)

अनघा said...

:) राम! आभार आभार! :)

Yogesh said...

अनघा ताई हार्दिक अभिनंदन अन पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा :) :)

अनघा said...

योगेश! आभार आभार! :)

Saurabh said...

बटव्यातली एक चांदणी म्हणून आम्हालादेखिल निवडल्याबद्दल धन्यवाद...

बाकी अपना तो फुल सपोर्ट हैईच... ;) :D

अनघा said...

सौरभभाई, आपके सपोर्ट पे तो हमारी घोडदौड चालू है! :p

हेरंब said...

तुझ्या जादू(च्या)इ-बटव्यात अजून काय काय दडलंय कोणास ठाऊक... :) (मला खात्री आहे भरपूर बक्षिसं दडलेली असणार :) )

आम्हाला असंच नवीन नवीन छान छान वाचायला मिळो !!

neela said...

हार्दिक अभिनंदन!!!

अनघा said...

नीला, आभार! :)

sahajach said...

अभिनंदन गं अनघा :)

मस्त वाटतं ना असं सगळं ...

पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल पुन्हा एकवार मन:पुर्वक अभिनंदन :)

अनघा said...

तन्वी...अगं, प्रकाशित म्हणजे माझ्या मित्रांची ही मला प्रेमळ भेट आहे... :)

अपर्णा said...

आजकाल निवांतपणा मिळत नाही गं वाचायला... पण अभिनंदन करायला उशीर झाला तरी ते आवश्यक आहे असं मला वाटतं..अभिनंदनअभिनंदनअभिनंदन..बाकी तुझ्या लिखाणाबद्दल म्या पामरीने काय
म्हणावं....ऑटोग्राफ़वाली पाटी हवीय मला...:)

अनघा said...

अगं अपर्णा! उशीर कसला आलाय! तुम्हां सर्वांशिवाय हे काय शक्य होतं?! उगाच आव आणत नाहीये, पण तुम्हां सर्वांनी जे जगायला बळ दिलं आहे...ते मी नाही कधी विसरू शकत! खरोखर...

ऑटोग्राफ़वाली पाटी!! हेहे!! मज्जा! :p

आनंद पत्रे said...

अभिनंदन..!!

रोहन चौधरी ... said...

कार्यक्रमाचे इतके अप्रूप नव्हते पण सर्वांची भेट हुकली... असो.. अनेकजण मी मराठी कार्यक्रमाला देखील भेटलेच... :) आणि त्या लोकरंग पुरवणीत तुझ्या मागे माझाच नंबर आहे... :D

अनघा said...

आनंद ! आभार ! किती उशिरा लिहितेय ना मी तुला माझी प्रतिक्रिया ! माफी त्याबद्दल ! :(

अनघा said...

:) सगळे भेटतात ही त्यातील मोठ्ठीच गोष्ट ! नाहीतर आपण आपले अदृश्य गप्पा मारत असतो सारखे ! :)

THE PROPHET said...

जादु-ई बटवा खासच आहे..
बझवर बहुदा अभिनंदन केलंच होतं! पुन्हा एकदा अभिनंदन ताई!!! असंच वारंवार अभिनंदन करायला मिळो!

अनघा said...

आभार रे विद्याधर ! :)