नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 31 March 2011

बोलके आत्मे...

"Let's go for a cup of coffee!"
"Ya...why not?"
कार्यालातील कर्मचाऱ्यांची संख्या अवाढव्य असल्याकारणाने इथल्या काही लोकांची नावे देखील माहित नसतात. पण ह्या आमंत्रणामागील नाव माहित होते. फक्त कामाचे ग्रुप्स वेगवेगळे असल्याकारणाने हाय हॅलो पलीकडे कधी बोलण्याचा प्रसंग नव्हता आला. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीची ही गोष्ट. हे आमंत्रण अजून एकदा दिले गेल्यावर मात्र एक दिवस आम्ही निघालो. कार्यालयाच्या आवारातच खाली CCD आहे. ज्याची बरेचदा आम्हाला मदतच होते. गुफ्तगू करता येते...कार्यालयातील रोजच्या राजकारणाची तापलेली चर्चा देखील तिथेच होते.

मोठमोठ्या काचांच्या खिडक्या. आणि त्या खिडक्यांना लागून असलेल्या कोचावर जागा मिळणे म्हणजे भारीच. स्थानापन्न झालो. समोरासमोर नाही तर अगदी बाजूबाजूला. का बरं? कोण जाणे?
"I lost my father some years back. It was a shock for me." मोनाने संभाषणाला सुरुवात केली.
शांतता. ह्यावर काहीही बोलणे म्हणजे भावनांचा अपमान हे नुकत्याच घडलेल्या घटनेने शिकवलेले होते.
"I went through depression then..."
एकुलत्या एक मोनाचे वडील काही वर्षांपूर्वी गेलेले होते. अचानक. त्यानंतर त्या धक्यातून आईला सावरताना मोनाला स्वत:ला सावरणे फार कठीण गेले. ती एक आर्ट डिरेक्टर. एका कामाच्या संदर्भात तिची एका महिलेशी ओळख झाली. महिला एक पुस्तक लिहित होती. त्याचे मुखपृष्ठ मोनाने करावे ही तिची इच्छा. मोनाने ते काम घेतले...व अधिकाधिक ओळखीतून मोनाला त्या महिलेत भावनिक आसरा मिळाला. त्यांचा पुत्र अकाली मृत्यू पावला होता. आणि त्यातून बाहेर पडतापडता हळूहळू त्यांना जाणवले ते असे....त्यांचा पुत्र त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होता. रोज ठराविक वेळी...ठराविक भाषेत. त्या अनुभवावर आधारित होते ते पुस्तक. जे मोना सजवत होती. वाटतं...मोना त्या बाईना मदत करत नव्हती तर त्या बाई मोनाला मदत करत होत्या. तिच्या गत वडिलांशी संवाद साधावयास. अथक प्रयत्नानंतर मोनाने ते कौशल्य स्वत: आत्मसात केले. आणि, मोनाचे वडील, त्यांचा आत्मा तिच्याशी बोलू लागला.
कॉफी आली.
संवादाचा रोख मृत्यूशी होता. ज्याने नुकताच माझ्या घराला स्पर्श केला होता. तिचे वडील काही वर्षांपूर्वी गेले होते. माझा नवरा एका महिन्यापूर्वी गेलेला होता. ठीक.
"Then?"
मोनाने तिच्या पर्समधून एक छोटी वही काढली. उघडली. माझ्यासमोर धरली.
"You won't understand the language." जिवंत माणसांची भाषा समजून घेताघेता नाकी दम. तिने उघडलेल्या वहीच्या पानावर लेखणीने मारलेले फक्त फराटे होते.
"But I understand. When my father talks to me..I start scribbling on the paper..."
"Ya? Good."
"Anagha, I want to tell you something."
"That I have understood by now. Tell." दगड. मन दगड.
"That day I was meditating and I sensed that something unusual was happening....souls come..they talk to me...they give me messages..and they expect me to tell their dear ones...that day Anagha, your husband came...he spoke to me...."
आत्मा झाला तरी नवऱ्याचा...महिना नाही झाला तर...तो असा येऊन परक्या बाईशी गप्पा मारायला लागला तर काय मोठं सुंदर वाटणार होतं?
"Ya? Good. So what did he tell you?"
"I have typed it in Word and have got a print out for you....he is very sorry Anagha...he is very sorry that he left you like this ...half way in the journey..."
त्याचं स्टेशन आलं...तो उतरून गेला. फक्त मला माहित नव्हतं की ते त्याचं स्टेशन होतं. त्याला नक्की माहित होतं. Simple.
दगड. मन दगड.
"Give me the paper. I will read it later."
अजून एकदा. अजून एकदा तिचं मेल आलं. नीट त्या आत्म्याशी केल्या गेलेल्या संवादाचा अभ्यास केला. माझ्या नवऱ्याने तिला दिलेल्या निरोपाचा मी थोडा अभ्यास केला. त्यात काही विशेष होतं? नव्हतं. एखादा अकाली गेलेला नवरा in general आपल्या बायकोला जे सांगेल तसलंच काहीसं ते होतं. जे काही आम्हां फक्त दोघांना किंवा आम्हां तिघांच्या छोट्याश्या कुटुंबालाच माहित असेल..असे त्यात काहीच नव्हते...जेणेकरून माझा ह्या आत्म्याशी होणाऱ्या संवादावर विश्वास बसेल. बसला? नाही. मला ह्या सर्व प्रकारावर विश्वास ठेवणे अशक्य वाटले. त्यात genuine असे काही नाही वाटले. तिने तिच्या दु:खावर उत्तर म्हणून हा वडिलांशी संवाद करण्याचा मार्ग शोधला असावा. माझ्या दु:खावर हे उत्तर होऊ शकत नाही.
मग तिनेही माझ्या नवऱ्याशी वेळीअवेळी गप्पा मारणे थांबवले. CCD तील आम्हीं एकत्र घेतलेली ती पहिली आणि शेवटची कॉफी. तिच्याकडून आलेले ते शेवटचे मेल.

मोना. इथे एक ग्रुप हेड. तिच्या हाताखालील माणसे...सर्व माझे जवळचे मित्र. Work front वर...सर्वांचे आत्मे दु:खी!
ह्यातच सर्व आलं!
:)

13 comments:

Raindrop said...

ur last line says it all. jya lokanna jeevant lokaanchi haay aiku yet nahi tyanna gelelya lokaanshi samvad bare saadhataa yetat....kaay labadgiri aahe!!! tu doorach raah haan tichyakadun!!

Anagha said...

खरंय वंदू! कुठून ही लोक ह्या कल्पना घेऊन येतात माहित नाही. अगदी समोर बसलेल्या माणसाचे दु:ख ह्यांना समजत नाही..आणि गेलेल्यांचे आत्मे ऐकू येतात...
that's weird...नाही का?

तृप्ती said...

ajab aahe haa prakaar.

Anagha said...

खरंच अजब गं तृप्ती.
शिक्षण आणि हे प्रकार, ह्यांचा काडीचाही संबंध नाही. नाही का?

आभार गं प्रतिक्रियेबद्दल.

हेरंब said...

बाप रे.. खरंच भयानक प्रकार करत असतात लोकं ! शेवटची ओळ परफेक्ट एकदम अशा लोकांसाठी !

Anagha said...

हेरंबा, मध्ये एका मुलाची गोष्ट वाचली होती...खरीखुरी. मला अश्रू नको, घाम द्या म्हणणारा.
त्याने म्हटले होते- "बरं झालं संकटं आली....मला माझीच माणसे कळून गेली!
:)

इंद्रधनु said...

अर्ध्यापर्यंत वाचतानाच मनात आलं, यांच्या मनाचे खेळ सगळे...

Anagha said...

खरंच इंद्रधनू, सगळे मनाचे खेळ!

सौरभ said...

by this post I learnt one thing about you... your conscience remain unaffected even in adverse... something I admire from bottom of my heart...

Yogesh said...

अनघा ताई...ज्या लोकांना जिवीत लोकांच्या भावना कळत नाही त्यांना आत्मे कसे काय कळतात?

शेवटची ओळ अगदी परफ़ेक्ट आहे.

Anagha said...

आहे ना गहन प्रश्न योगेश?! सगळी ढोंगं रे! :)

THEPROPHET said...

हळव्या मनस्थितीत माणसं कसलाही आधार शोधतात गं.. मग एरव्ही तो माणूस कसा का असेना!

Anagha said...

हम्म्म्म खरंय विद्याधर.