नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 13 March 2011

विहीर

प्रभातकाळी, आज एक बरं झालं...
कोरड्या विहिरीला पाणी लागलं.

वर्ष उलटून गेलं...
भूकंप झाले, जमीन सरकली, आभाळ कोसळलं....
पण हिने पाणी नाही काढलं...

सगळ्यांनीच आता बंड केलंय...
विहिरीविरुद्ध आवाज उठवलाय...
वासेच त्यांनी फिरवायला घेतलेत...
कसं नाही पाणी लागत चंगच बांधलाय...

त्यांच्या श्रमांना फळ आलं...

कोरड्या विहिरीला आज प्रभातकाळी पाणी लागलं...


22 comments:

Raindrop said...

salt water vihir ...

shweta pawar said...

कधीतरी दगडाला पाझर फुटेल पण माणसाला नाही फुटत ग...
काहींच्या आयुष्याच हे खूप मोठ दुख असत

shweta pawar said...

Anagaha majha first blog lihalay plz vach aani kalav

http://pawarshwet.blogspot.com/2011/03/blog-post.html

भानस said...

चला, आता दारोदारी पाणी देता का हो म्हणत हिंडायला नको. :)

श्रीराज said...

:) सुंदर झालंय हे modern piece of art :)

श्रीराज said...

; पण मी केवळ गृहीत धरलंय की ही कविता मला कळलेय ;)

अनघा said...

:) 'खारी विहीर' हे नाव चांगलं झालं असतं नाही का वंदू?

अनघा said...

खरं आहे श्वेता...

वाचलं काल तुझं लिखाण. छान आहे! :)

अनघा said...

ह्म्म्म!
मुंबईतील पाणी टंचाईला उत्तर! नाही का भाग्यश्री?!
:)

अनघा said...

ह्म्म्म.... श्रीराज, दु:ख ही समजायला कठीणच असतात!

श्रीराज said...

आता कळली :(

Gouri said...

अनघाबाय, काय चाललंय? पाझर फुटणारच नाही असा कशाला हट्ट हवा ग? थोडंसं पाणी काढलं तर चालतंय की. तवढाच जरा निचरा होईल, हलकं वाटेल. पुन्हा सावरून उभं रहायला बळ येईल.

का मला समजली नाहीये तुझी पोस्ट?

BinaryBandya™ said...

छान ..

अनघा said...

समजलीय गं गौरी तुला...
सगळ्याच फ्रंट वर टेन्शन्स आहेत....
म्हणून जरा...
ठीक आहे बाकी.
:)

अनघा said...

बंड्या,
आभार. :)

THE PROPHET said...

ताई,
काळजी घे गं! :(

सौरभ said...

चला आता विहीरीला पाणी आणलच आहे तर आम्ही ते उपसून उपसून विहीर कोरडीठण्ण करु...

अनघा said...

ह्म्म्म.
घेतेय रे विद्याधर...
जरा मध्येच ट्रॅक सोडते गाडी!
:)

अनघा said...

:D सौरभ!

sanket said...

इकडे आजही विहीरीला पाणी नाही आले :( (पण हा संदर्भ वेगळा आहे.. )
जग आपल्याविरुद्ध सूड घेऊन उभे राहते ना, मग पाणी लागणारच.. कधीकधी आपल्याच फ़ायद्याचे असते..आपला दृष्टिकोण कसा आहे त्यावर सगळे ठरते.

रोहन चौधरी ... said...

...

पुरे आता... थेंब इथपर्यंत पोचले...

अनघा said...

hmmmm