नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 1 March 2011

एक कायदेशीर प्रतिक्रिया

माझ्या कालच्या पोस्टवरील, अॅडव्होकेट राजीव फलटणकर ह्यांची प्रतिक्रिया ही अतिशय माहितीपूर्ण वाटली...म्हणून आजची पोस्ट म्हणून त्यांची तीच प्रतिक्रिया टाकत आहे...
आशा आहे की ती मला जशी महत्त्वाची वाटली तशीच तुम्हांला देखील वाटेल.
:)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या गेल्या २०-२५ वर्षातील वकिली व्यवसायातील अनुभवातून हे कळून आलेय की - व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खरेय! आपकमाईतील सोडाच पण जेंव्हा वारस म्हणून बापकमाई हातात येते तेंव्हा आधीच्या पिढ्यांचे ती मिळवण्यात लागलेले कष्ट लक्षात न घेता, वाढून आलेले ताट आपले एकट्याचे आहे असे समजून त्यावर ताव मारण्याची वृत्ती ही व्यक्ती सापेक्ष आहे.स्थावर इस्टेटीच्या `आकाश फाडून जाणाऱ्या किमती' ह्या या सगळ्या नात्यांच्या ऱ्हासास मुख्यत्वे कारणीभूत होत आहेत. सुशिक्षितपणाचा त्यात काहीही संबंध नसतो.

म्हणूनच मी इथे नमूद करू इच्छितो की-

१. पूर्वज जी संपत्ती सोडून गेले आहेत ती आपली एकट्याची नाहीच आहे...तीच्यावर त्यांच्या सर्व वारसांचा हक्क आहे. कारण ती आपण मिळवलेली नाही. त्यामुळे आपल्या प्रत्येक भावाचा व बहिणीचा त्यावर आपल्या इतकाच हक्क आहे व हे तत्व आता कायद्याने पण मान्य केलेलं आहे.

२. सर्व वारस हे सारखेच हक्कदार आहेत. परंतु `हाजीर तो वजीर' वा `कसेल त्याची जमीन' या न्यायाचा गैर अवलंब करून, इतर वारसांचे हक्क डावलले जातात व त्यामुळे सर्वच नात्यात दुरावा निर्माण होतो. कारण धनाची (विना कष्ट) अभिलाषा बहुश: प्रत्येकाला कमीअधिक प्रमाणात असतेच. परंतु आपल्याच रक्ताच्या पाठच्या व/वा पुढच्या माणसाचे हक्क हिरावून/ नाकारून, आपण आपल्या मुलांसमोर आपल्या आप्पलपोटेपणाचे /स्वार्थाचे एक उदाहरण घालून, त्यांच्यामध्ये नसलेली विषवेली अंकुरून ठेवतो.
यावर उत्तम उपाय म्हणजे `इच्छापत्र '! आपल्या संपत्तीचे आपणच वाटप करून ठेवावे म्हणजे वारसांना ते मंजूर नसले तरी बंधनकारक असते व त्यायोगे कदाचित उदभवू शकणाऱ्या वादाचे मूळ कारण नष्ट होऊ शकेल व नाती दृढ राहण्यास मदत होईल.

३.आज लोकं इस्टेटीला नामांकन करून ठेवतात. पण हे नामांकन ही फक्त एक कार्यालयीन सोय आहे. ते इच्छापत्र नाही. व त्यामुळे मृत्यू पावणाऱ्याच्या अज्ञानातून, त्याच्या वारसांत मात्र त्यावरून वाद निर्माण होतात. ज्याचे नाव नामांकनावर आहे त्याचा गैरसमज (सोईस्कररित्या) होतो की - माझे नाव ह्या इस्टेटीवर नामांकन म्हणून आहे ह्याचा अर्थ ही इस्टेट माझीच आहे. म्हणून नामांकनाबरोबरच इच्छापत्र लिहून ठेवणे हे आवश्यकच आहे.

खरे तर जी बापकमाई आपल्यापर्यंत येते तिचे आपण रखवालदार असतो व त्याचे संवर्धन करून पुढील पिढ्यांच्या हातात ते सोपवणे हे आपले कार्य असायला हवे.

माझा एक अनुभव - माझ्या एका पारशी पक्षकाराने (७८ वर्षे) आपले घर आपल्या वारसांना [१ मुलगा (बदफैली), १ मुलगी (विवाहित) , पत्नी ] यांना न देता त्यांच्या ५० वर्षे शेजारी असलेल्या (आता २ कि.मी.वर असलेल्या) मुस्लीम दाम्पत्याला दिले. मात्र पैसे सगळे पत्नीला दिले. हे इच्छापत्र करीत असताना मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. तेंव्हा त्या पारशी गृहस्थाने सांगितले की माझ्या माघारी माझी पत्नीला धमकावून माझा मुलगा घर हिसकवून घेईल व मुलगी, ७५ वर्षाच्या आईला परदेशात नेणार नाही. मात्र माझे शेजारी हे माझ्या पत्नीचा आईप्रमाणे सांभाळ करतील ही मला खात्री आहे.
५ वर्षांनी ते गृहस्थ गेल्यावर मी पुढील कामे केली: - एक आठवडा घरात आईला डांबून ठेवणाऱ्या, अचानक उपटलेल्या मुलाला पोलिसांकरवी अटक, आईची सुटका व पुढील ७ वर्षे त्या पूर्वीच्या शेजारच्या मुस्लीम दाम्पत्त्याने केलेली त्या स्त्रीची स्वतःच्या आईप्रमाणे केलेली सेवा, याचे भरल्या डोळ्यांनी घेतलेले दर्शन!

त्या पारशी गृहस्थांची माणसाची पारख किती अचूक होती!

20 comments:

rajiv said...

अनघा, ती एक निव्वळ प्रतिक्रिया होती . तरी त्याबाबत योग्य ती कायदेशीर माहिती प्रत्येकाने जाणून घेणे आता आवश्यक बनले आहे ज्यामुळे पुढील पिढीला मागील पिढ्यांतील नात्यांची विण न उसवता रहाता येईल !!

Unique Poet ! said...

अनघाताई ! कालच्या आणि आजच्या पोस्टवर एकत्रित प्रतिसाद देतो इथे.....!

ह्या वाटण्या , त्यावरून होणारे दावे , भांडणे , दूरावे... वगैरे व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकवेळ झाले तर किमान त्या व्यक्तीला ते पाहावे लागत नाही... जोडीदाराचे मात्र हाल होतात......
पण ज्या आई-वडिलांनी भावनेच्या भरात वाहवत जाऊन हयातीतच मूलांच्या नावावर प्रॉपर्टी केली ... त्यांची काय अवस्था म्हातारपणाच्या असहाय्य अवस्थेत झाली त्याचा अनुभव माझ्या मामांकडूनच मीही घेतलाय ..... अनुभव मांडायचे नाहीत मला ... त्याची उदाहरणे ठायी ठायी आहेत . ... पैसा माणसाला वाटेल त्या थराला नेतो .. मग ही रक्ताची नाती ..... त्यांना काहीही अर्थ उरत नाही ... राजीवजी म्हणतात तसे सुशिक्षितपणाचा यात संबंध नाही.. संस्कारांचे काय.? अशा बाबतीत मी तरी उद्विग्न होतो... !

Vinayak Pandit said...

खूप महत्वाची माहिती उजेडात आणली आहे तुम्ही अनघा.राजीवजींच्या प्रतिक्रियेमुळे केवळ कायदाच नाही तर याबाबतीतलं विवेकनिष्ठ मतही उजेडात आलंय.दोघांनाही धन्यवाद!
हा गुन्ह्याचा एक स्थिरावणारा प्रकार व्हायला लागलाय की काय? असाही विचार वर्तमानपत्रांमधून येणार्‍या बातम्यांतून जाणवतो.याचबरोबर घरात होणारे टोकाचे अत्त्याचार, लैंगिक गुन्हे(तांत्रिकमांत्रिकांना फोडलं पाहिजे)आणि समलैंगिकतेमुळे होणारे गुन्हे हल्ली ठळक जागा व्यापू लागलेत.वृत्तपत्रं, वाहिन्या हे सगळं चविष्ठपणे चघळताएत.वाईट वाटतं.

panda said...

फार गंभीर विषय आहे. भरपूर ऐकले आणि बघितले होते आणि शिवाय हे इतके सर्व वाचल्यावर स्वत:ला फार भाग्यवान समजतो. माझे बाबा आणि त्यांची आठ भावंडे काही जास्त शिकलेली नाहीयेत, काय ते दहावी किंवा बारावी. आजोबा-आजी गेल्यावर, सर्व एकत्र आले आणि समंजसपणे हा तंटा सोडवून घेतला. ज्या कुटुंबाना हा सर्व मन:स्ताप होतो, त्यांच्या भावना समजू शकतो. मला खात्री आहे, सर्व काही व्यवस्थित होईल.

अनघा said...

राजीव, आम्हां सर्वसाधारण माणसांना ह्या बाबी माहिती नसतात. आणि मग अज्ञानात भीती असते...धन्यवाद इतकी सोप्प्या शब्दांत माहिती दिल्याबद्दल. पूर्वी शेजारच्या घरात घडणाऱ्या घटना आता आपल्या घरात शिरकाव करताना दिसतात...म्हणून एकूणच चिंता वाटते...

अनघा said...

'पैसा माणसाला वाटेल त्या थराला नेतो .. मग ही रक्ताची नाती ..... त्यांना काहीही अर्थ उरत नाही'....
खरं आहे तुझं समीर...निदान आपण जेव्हढी जमेल तेव्हढी काळजी घ्यावी....ह्या कायद्याच्या बाबी माहिती असल्या तर थोडीफार मदत होऊ शकेल असे वाटते....

अनघा said...

विनायक, दुर्दैवाने किती खरं आहे तुमचं म्हणणं....'हा गुन्ह्याचा एक स्थिरावणारा प्रकार व्हायला लागलाय'...
मला नेहेमी ह्या टीव्हीवरील मालिका बघून हाच प्रश्न पडत रहातो...ही कुटूंबांकुटूंबांमधील इतकी जटील कपट कारस्थाने दाखवून हे साधतात तरी काय?! कोणीच काही चांगलं दाखवत नाहीत! ज्यातून काही धीर येईल...जगावरील विश्वास थोडा बाकी राहील!

अनघा said...

पंकज, खूप खूप आभार ही इतकी छान गोष्ट आम्हांला सांगितल्याबद्दल....माणुसकीवरील, प्रेमावरील विश्वास बळावतो....आणि आपला लढा लढायला त्यातूनच बळ येतं. :)

हेरंब said...

खरंच.. खुपच महत्वाची माहिती आहे ही..

Raindrop said...

I somehow didn't agree with your last post so I kind of kept quite and I have a different opinion on this one too...here is what I feel -

I believe the house belongs to the person who one who stays in that house, takes care of it, has set up his/her little sansar in that house. Even though I might have an equal haqq in my Dad's house, I at no point find it correct to go at a later stage in life to go and say 'hey Bunty this is my house too and I want to sell my share so either you buy it or let me do what I want with it.

He and his wife are living there....it is their world...that is where they have taken care of my parents. Is it really right to go and take away from them what is just a piece of property for me (which I never bothered to visit or take care of in my entire married life but suddenly one day want it).

Kaayda might be on my side but then I have to decide whose side I am on. It is easy to go and say 'this is my dad's place hence mine too'....but what have I really done to take care of it??? It has to go to the person who has spent years of sweat and blood to maintain it. To me it is a house, to him it is home he comes back to everyday.

अनघा said...

Good for Bunty....in your case the situation is far different than what we are facing right now. Unfortunately my mother has to go through all this at this age.
Can discuss it over the phone...
:)

If you have noticed....a common factor in all the cases I mentioned is..people are unaware that a daughter has an equal right as a son in the ancestor property...i found a need to write it publicly just to make people aware of this....Because I know nowadays...it's all about 'घरोघरी मातीच्या चुली...' :)

rajiv said...

Vandana, I have read your version as a lawyer & as a lay man. I agree with you, but would like to clear that as long as it is Bunty’s home, even law forbids its partition but when it becomes only a house and a sell able commodity, then rights of all share holders pop up and then it becomes distributable. Sale proceeds are to be distributed. And if that property is ancestral for more than one generation ( i.e. not self acquired by parents of the residents ) then the succession rights can not be denied. Now Law has granted equal rights to all members of family.
But one may forgo all his interests & rights depending upon their mutual relations and the treatment received from occupants And this should be done in writing to save future generations from any disputes.

Raindrop said...

@rajiv - hmmm now I get it :) so as long as he is residing there...I can't say anything but if he decides to sell it then the rights become equal...depending solely on the fact that Dad has divided equally...right?? Coz it is Dad who built the house so it is not ancestral. Thanks for the info :)

@ anagha...yes I know...ur situation is way different...I was talking in generic terms.

rajiv said...

वंदना , या अनघाच्या पोस्ट च्या अनुषंगाने, भारतीय वंशाच्या वारसाहक्कांबाबत सगळ्यांना मी थोडी अधिक माहिती देऊ शकलो हे बरेच झाले नाही का ?

अनघा said...

:)हेहे! हातून सत्कृत्यच झालं म्हणायचं! :p

rajiv said...

पांडा , मला तुझ्या कुटुंबाचे कौतुक व अभिमान वाटतो. हा समजूतदारपणा व `वाटणी पेक्षा जोडणी श्रेष्ठ ' हि जाण असणेच महत्वाचे ..!!

सौरभ said...

अश्या बऱ्याचश्या कायदेशीर गोष्टी मी पपांकडून शिकतोय.

THE PROPHET said...

भलतंच टेन्शन आहे राव! :(

अनघा said...

जाऊ दे विद्याधर...नशिबाने तुझ्यासमोर नाही ना हा गोंधळ! :)
पण कधीही कुठेही कोणी जवळचा हा गोंधळ घालत असेल तर ही माहिती लक्षात असू दे म्हणजे झालं. :)

अनघा said...

बरं ना सौरभ? सध्याच्या काळात हे थोडं माहिती असलेलं बरं...अर्धवट ज्ञान बऱ्याचदा धोक्याचं असतं...परंतु, असं काही आहे हे जरी माहिती असलं तर प्रसंग आलाच तर नीट माहितगाराकडून माहिती घेता येते.
माझे बाबा देखील होते असे सर्वज्ञानी! :)