नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 18 February 2011

नको तिथे...

"ही तू ठेवलेली देवांची जागा बरोबर नाही."
"म्हणजे? मी पूर्वपश्चिम बघूनच ठेवलेत देव!"
"तरी पण....इथेच तू जेवण करतेस आणि तिथेच देव आहेत!"
"अरे? पण अन्न हे पुर्णब्रम्ह्च नव्हे काय? आणि म्हणतात बेडरूममध्ये ठेवू नयेत....हॉलमध्ये ठेवू नयेत...मग आता कुठे ठेवणार मी त्याला?"
"ते काही मला माहित नाही! ते तू बघ!"
"ठीक आहे...ही जागा बरोबर नाही. बरोबर?"
"हो."
"आणि माझ्या ह्या घरात दुसरी काही जागा नाही..."
"तुझ्या घरात देवाला जागा नाही!?"
"तसं नाही म्हणतेय मी...पण जर देवाला वाटतंय की मी त्याची बसण्याची नीट व्यवस्था केलेली नाही...आणि म्हणून तो माझ्यावर नाराज आहे...आणि वेळोवेळी त्याला ही त्याची नाराजी दाखवावीशी वाटत असेल...तर द्यावं त्याने मला मोठं घर घेऊन...मुंबईत...मग मी बसवेन त्याला...चुलीपासून दूर....हवं तिथे!"
"तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये!"
"अरेच्चा! त्याच्या मनाजोगती जागा त्याला हवी असेल तर त्यालाच नको का प्रयत्न करायला? कम्मालेय! पटत का नाहीये तुला?!"

27 comments:

हेरंब said...

पटलं पटलं...

देवाला पटतंय का विचार? ;)

sanket said...

खरे तर देवाला वेगळे देवघर हवे, पण आपल्या दुर्दैवाने माणसालाच रहायला पुरेशी जागा नाही तिथे देवाला वेगळे घर ते कसे बांधणार? आमचा देव पंधरा वर्षे बेडरुममधे होता. त्याचे काही अडले नाही, आमचेही काही बिघडले नाही.आता त्याला वेगळे देवघर बांधले, म्हणून तो काही नाचला नाही, आमच्याही आयुष्यात फ़रक पडला नाही.
सध्याच्या काळात तरी देव कुठे असावा, कुठे नसावा या प्रश्नाचे एकच समाधानकारक उत्तर आहे, "तो हृदयात असावा."

Gouri said...

अनघा, देवाला असा घरातला एक कोपरा राखून कशाला ठेवायचा? त्याला त्यापेक्षा तो आपल्याबरोबरच सगळीकडे हिंडवावं :)

भानस said...

देव, जळी स्थळी असतोच. आमचाही कायमचा चुलीपाशीच आहे. :)

संकेत म्हणतो तसे तो हृदयी वसावा...

Anagha said...

हेरंब, देवाला पटलं तर तो त्याच्या कृतीतून दाखवेलच. नाही का? बघू कधी दाखवून देतो ते! ;)

Anagha said...

स्वामी संकेतानंद! किती खरं बोललात!
आभार, आभार!
:)

Anagha said...

गौरी, म्हणजे हृदयात घेऊन का??
तुम्हीं सगळ्यांनी तर माझा हनुमानच करून टाकलाय! ;)
आभार गं!
:)

Anagha said...

भाग्यश्री, मला आता मी दिसतेच आहे...हृदयात राम... ;)
धन्यवाद गे! :)

Raindrop said...

aaji has a devghar pan ti azun ashaantach even at 91....majhya ghari devach nhavte initial 5 years (just one pic I hung in my PG accommodation) then too he keeps blessing me n we both (God n I) seem to be happy happy about it.....so I don't think it's go anything to do with where he stays as long as he lives in ur actions.

Anagha said...

'it's got anything to do with where he stays as long as he lives in ur actions.'.....beautifully said Vandu... :)

Anonymous said...

संकेत :)

अगं देवाला नाही पडत काहीच फरक.... मला तर मुर्तीतून देव अश्या विचारवंतांना हसताना दिसतो नेहेमी :)

BinaryBandya™ said...

नाही नाही देवांना फरक पडतोच म्हणूनच तर अर्ध्यापेक्षा जास्ती देव उंच कुठेतरी डोंगरावर थंड हवेच्या ठिकाणी जाऊन बसलेत ..
कैलास पर्वत , भीमाशंकर , जोतीबा , जेजुरी बघा सगळ्यांनी कशा मोक्याच्या जागा हेरल्या आहेत ..

तुमच्या घरातला देव नक्कीच हात-पाय हलवेल ..
नक्कीच

Anagha said...

हो ना तन्वी...पण हे सर्व हसण्यावारी नेण्याचं तो कधी थांबवणार आहे कोण जाणे! :) आभार गं...

Anagha said...

स्वत:साठीच करायचं म्हटल्यावर हलवेल नाही का तो हातपाय? :p
आभार बंड्या, प्रतिक्रियेबद्दल.

Shriraj said...

:)पटलं तुझं!!

Anagha said...

:)

THEPROPHET said...

तू हल्ली देवाच्या भलतीच मागे लागलीयेस हां! :D
मुका बिचारा कुणी हाका!

सौरभ said...

जसं अन्न पुर्णब्रह्म आहे तसंच प्रत्येकात देव आहे. म्हणुन मीपण देव आहे. आणि आपल्याला काय... कोणतीही जागा चालते ब्वा. मी बाहेर उंडारतो, घरात कुठेही विहारतो. हॉल असो, किचन असो, संडास-बाथरूम असो... आपला वास सगळीकडे आहे. (वास म्हणजे "smell" नव्हे... काहीतरी भलताच अर्थ निघायचा नाहीतर. ;P :D lol)

- (छोटा देव) सौरभ O:-)

Anagha said...

हेहे! विद्याधर मला एकदम वाक्कप्रचारच आठवला! ......... आणि देवपूजेला लागले! I hope असं काही तुला म्हणायचं नाहीये!
:p

Anagha said...

:D
सौरभ, प्रसन्न हो रे बाबा! :p

Suhas Diwakar Zele said...

स्वामींना अनुमोदन...

सौरभ said...

lol त्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागेल. व्रत आहे त्यासाठी. :D

Anagha said...

मलाही तसेच वाटते सुहास, देव हृदयात असावा...मग तो आपोआप आपल्या कृतीतून प्रकट होत रहातो...वेळोवेळी. नाही का?

धन्यवाद... :)

अपर्णा said...

देवाला नाही गं आपल्याला फ़रक पडला तरच अडतं...
आता अशा कडाक्याच्या थंडीत चाळीसाव्या दिवशी देवळातच न्यायला पाहिजे अशा मताची मी नसल्याने बाळाला घरच्या देवाला नमस्कार करवला...

रोहन... said...

आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणाऱ्या भगवंतास आपण काय एका देव्हाऱ्यात ठेवणार... पण माझी आजी म्हणायची... देवघर वेगळेच हवे. बाहेरून आलेल्या लोकांना (काही सण, विशिष्ट दिवस सोडून) देव दिसता कामा नयेत. ते फुलांनी झाकून ठेवावे म्हणजे इतकी फुले वाहावीत की ते सहजपणे दिसू नयेत... गावाला मागेलदारी थोडीच जास्वंदाच्या फुलांची कमी...

आमच्या ह्या घरी सुद्धा शामिकाने वेगळी खोली थाटली आहे बंर... :)

Anagha said...

देव मनात असावा..नाही का गं अपर्णा ? तो तिथेच नसेल तर मग उपयोग काय रांगा लावून देवळासमोर ?!

Anagha said...

'आता जळी स्थळी काष्ठी पाषाणी असणाऱ्या भगवंतास आपण काय एका देव्हाऱ्यात ठेवणार...' अगदी अगदी रोहन ! एकदम पटलं.