नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 28 January 2011

मिले सूर मेरा तुम्हारा...

रोज सकाळी दहा वाजता. म्हणजे दिवाळी, गणपती, नाताळ आणि इतर बारीकसारीक सुट्ट्या सोडल्या तर रोज सकाळी दहा वाजता ते वाजायचं. प्रथम प्रार्थना. अंतरमम विकसित करी हे करुणाकरा...आणि सर्वात शेवटी जन गण मन. लाऊडस्पीकरवर गायनाचे जोगळेकर मास्तर आणि त्यांची आवाज बरा असलेली टोळी. मास्तर पेटी वाजवत गायचे. त्यांच्या सुरात सूर मिळवून त्यांच्याबरोबरची मुलंमुली. साथीला वर्गात आम्हीं सर्व.

लांब गडद निळा स्कर्ट, पांढराशुभ्र ब्लाऊज, कपाळावर लाल टिकली. मुली. नाकावर शक्तिशाली चष्मा, लाल रिबिनीत गुंडाळून आवरलेल्या दोन घट्ट वेण्या. ही माझी त्या गणवेषात भर.

बरोबर बारा वर्षे. बरोबर बारा वर्षे आम्हीं जन गण मन न चुकता...अर्थात ह्यात चुकण्याचा प्रश्र्नच कुठे आला...पण तरीही...नेमाने राष्ट्रगीत म्हणत होतो. अजिबात न हलता. श्वास घ्यायला जितकं हलवावं लागतं तितकंच पोट हलवायचं. बाकी चुळबुळ काही नाही. 'जयहिंद' म्हणून कडक हाताचा छातीशी सलाम ठोकायचा आणि मग बस्तान मांडायचं. रोज पाच इंग्रजी शब्द पाठ केले तर अगणित इंग्रजी शब्द पाठ होतील आणि माझी भाषा सुधारेल असं बाबा म्हणायचे. मग त्या गणितानुसार जर इतकी वर्ष हे गीत म्हटलं असेल तर ते किती तोंडपाठ झालं असेल? हो कि नाही? झालं असेल कि नाही? आहेच मुळी तोंडपाठ! शंका का आलीय?

आली ना, शंकाच आली! परवा काय होतं? काय होतं आपलं परवा? बरोबर! प्रजासत्ताक दिन! मग? मग काय? आमच्या पीव्हीआरला गेलो होतो आम्हीं. मैत्रिणी मैत्रिणी. चित्रपट बघायला. ते काय ट्रेलरबिरलं झालं. आणि मग पडद्यावर सूचना झळकली. आम्हीं हातातलं सामानबिमान झटकून तत्परतेने उभ्या राहिलो. राष्ट्रगीत सुरु झालं. ताठ मान सरळ नजर. स्तब्ध. कुठेही हे गीत लागलं की आपोआप मनातील रेकोर्ड चालू होते. तशी परवाही चालू झाली. जन गण मन अधिनायक जय हे...आता इथे काही जोगळेकर मास्तर त्यांच्या बालचमू बरोबर हजर नव्हते. एक सुरेल आवाजाची झाक असलेल्या बाई, गात होत्या. संथसंथ संगीतासमवेत. आमच्या मास्तरांची नुसती पेटी असायची, इथे मात्र अगदी साग्रसंगीत. परंतु, गडबड! इतक्या सगळ्या संगीतात बाई एकदा वेगळा शब्द उच्चारल्या. म्हणजे आम्ही जे शाळेत म्हणत होतो त्यापेक्षा थोडा वेगळा...अर्थ तोच पण शब्द वेगळा. मी मनात म्हणतेय एक शब्द आणि बाई बोलतायत वेगळं! मास्तरांनी आम्हांला काही वेगळं सांगितलेलं होतं! आणि ह्या बाई काही वेगळं!

आता काय माझ्याच देशाचं राष्ट्रगीत मी गुगल काकांना विचारू?!

(विचारलं मी गुगल काकांना! स्वस्थ बसवेना. त्यांनी सांगितलं, भारतात जितक्या भाषा आहेत तितक्या भाषांमध्ये आपले राष्ट्रगीत म्हटले जाते. त्यामुळे वरवर बघता जरी ते एकच वाटले तरीही एखाददुसऱ्या ठिकाणी उच्चार वेगळे आहेत.)

बाई कोणी वेगळ्या भाषेच्या होत्या बहुतेक! त्यामुळे त्यांचं माझं 'मिले सूर मेरा तुम्हांरा'...नाही झालं!
बस्स इतकंच!


मराठी बोल-
जनगणमनअधिनायक जय हे भारतभाग्यविधाता ।
पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग ।
विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग ।
तव शुभनामे जागे, तव शुभ आशिष मागे ।
गाहे तव जयगाथा ॥
जनगणमंगलदायक जय हे भारतभाग्यविधाता ।
जय हे, जय हे, जय हे ।
जय जय जय जय हे !

18 comments:

samc said...

which word was different? :-)

Anagha said...

'वंग' and 'मागे'!

THEPROPHET said...

मला वाटलंच 'वंग' वर येणार..
बिचारा 'वंग' :D
गुगलकाका बरोबरच सांगताहेत.. असंच असणार...
पण ते 'मागे' ला ती काय म्हणाली???

हेरंब said...

मला वाटलं आपल्या सकाळच्या बझ चर्चेवर लिहलंस की काय :)

Anagha said...

च्छॅ! तेव्हा हापिसात बसून मध्ये मध्ये हे लिहित होते आणि लिहिता लिहिता शोधाशोध करत होते! म्हणून तर आकाला पटकन लिंक देऊ शकले! :)

Anagha said...

'माघे!' असं मला ऐकल्यासारखं वाटलंय हा!
काय ना विद्याधर! एकपण गोष्ट आपण एकसारखी करत नाही! आणि तरी जिवापाड एकता जपतो!
:)

सौरभ said...

जनगणमन बाबतीत बरेच वाद पण आहे. हे गान इंग्लंडचा राजा जॉर्ज ह्याच्या स्वागतार्थ लिहलं गेलं असंदेखिल म्हटलं जातं. माझ्यामते, ते 'वंग' नाही, तर 'बंग' असावं.

Anagha said...

सौरभ, हिंदी मध्ये 'बंग' आहे...मराठीत 'वंग'! :)
आणि आता वादाबद्दल- http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%A8

हे वाचा...उगाच वाद घालू नका...
:)

panda said...

खरं सांगू...परवा "प्रजासत्ताक दिना"ची परेड बघताना, स्वत:चीच लाज वाटली. मागची ५-६ वर्षात राष्ट्रगीत फक्त "स्वतंत्र दिन" आणि "प्रजासत्ताक दिन" याच दिवशी आठवते. आयुष्याची १५ वर्षे रोज राष्ट्रगीत म्हटलं असलं तरी...मधले मधले काही शब्द पूर्णत: विसरलो.
"हिंदी मध्ये 'बंग' आहे...मराठीत 'वंग' " वाद बद्दल, मी ही सौरभ शी सहमत आहे...हा 'बंग' म्हणजे 'बंगाल' चा....असे मास्तर म्हणायचे. मास्तर कधी चुकता, व्हंय ??? आणि हो...हा वाद, साधासुधा नाय...तर "राष्ट्रवादी" हाय !!

Anonymous said...

अगं या ’वंग’ आणि ’बंग’ चा माझाही घोळ होतो नेहेमी... कारण असेच कोणी काय म्हणते तर कोणी काय... आपल्याकडे नुसती एकता नाहीये, एकता कपुरवाली एकता आहे...

यात घोळ कोणाचा होतो माहितीये, आपल्या मुलांचा.. राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा हे जिथे ईतके गुंतागुंतीचे मुद्दे आहेत, त्यांनी कसं समजावून घ्यायचं हे सगळं....

Anagha said...

पंकज, मला अजिबात माहिती नव्हते कि आपले राष्ट्रगीत असे विविध भारतीय भाषेत वेगवेगळे म्हटले जाते!! खरं तर हा अगदी 'साधा' कॉमन सेन्स ( :) ) आहे. नाही का? पण नव्हतं खरं माहित!
रहाता राहिले त्या वादाबद्दल! अरे, आपल्या देशाला सध्या इतके विविध आणि अतिशय गंभीर प्रश्न भेडसावत आहेत ना कि राष्ट्रगीताच्या वादात शक्ती आणि वेळ घालवायलाच हवी आहे का? असा प्रश्न मनात उभा रहातो. आपले पुढारी मुद्दाम आपले लक्ष ह्या अश्या वादात गुंतवत आहेत. आपण का त्याला खतपाणी घाला आणि त्यांचे फावून द्या? :)

आभार रे प्रतिक्रियेबद्दल.
आणि आगासी मिळाला का?

rajiv said...

अरे सौरभ, माझ्या माहितीप्रमाणे `इंग्लंडचा राजा जॉर्ज ह्याच्या स्वागतार्थ' लिहिण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना सांगण्यात आले होते त्यांच्या एका इग्लिश मित्राकडून. परंतु हे `न पटणारे काम' मैत्रीमुळे अव्हेरणे अशक्य असल्याने, त्यांनी कल्पकतेने `भाग्यविधाता ' हे त्या जगन्नियंत्याला ( देवाला , राजा जॉर्ज ह्यास नाही) उद्देशून वापरले आहेत . ( त्यामुळे मित्रपण खुश आणि स्वतःच्या मनाशी प्रतारणा पण नाही )

rajiv said...

तेंव्हा सौरभ - यावर वाद/मतभेद असेल तर तो आपण घालूया काय ....? म्हणजे `सो कु' सारखी महाचर्चा नाही होणार !

Anagha said...

हेहे!! सौरभला काका ओरडले!! :p

Anagha said...

खरंय ग तुझं तन्वी...मग कदाचित आपण आपल्या मुलांना कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यावयास हवे, हे शिकवायला हवे! नाही का?

Shriraj said...

Hi mazyasathi hi navinach mahiti ahe :)

Anagha said...

:) हो ना श्रीराज?

Unknown said...

bhasha kontihi asso rashtrageet mhantana bhashe peksha bhavnana jasta mahatva dyave