नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 8 December 2010

पाऊसवाला नाना

आवाज आणि स्वच्छ स्पष्ट विचार ह्यांचे मिलाप म्हणजे नाना पाटेकर. मी एका कामानिमित्त त्यांना भेटले होते. आणि त्या अनुभवावर एक पोस्ट देखील लिहिली होती. आज त्यांचा एक व्हिडीओ बघितला आणि असं वाटलं की तो बघण्यातील माझ्या आनंदात तुम्हांला तर सामील करून घ्यायलाच हवं. ही एक सवय लागली आहे बहुतेक आता मला. सुखदु:खाला तुम्हां सर्वांबरोबर सामोरं जाण्याची. ती सवय बरी की वाईट हे तुम्हीच ठरवा. :)

पाटेकर ज्या सिनेमाबद्दल इथे बोलले आहेत ती एक अतिशय सुंदर संगीतिका आहे. 'थोडासा रुमानी हो जाये'. चित्रा आणि अमोल पालेकर जोडीने दिग्दर्शित केलेली. त्यातील संवाद आणि गाणी सुंदर. लिहिली आहेत कमलेश पांडे ह्यांनी. जाहिरातक्षेत्रातील हे एक बडे नाव. अप्रतिम हा एकंच शब्द. युट्यूबवर आहे हा अख्खा चित्रपट. दहा भागात. नक्की बघा...वेळात वेळ काढून!

आता ऐका...
काय आवाज आहे!
टाळ्या टाळ्या आणि टाळ्या!19 comments:

सुहास झेले said...

थॅंक्स वीडियो खूप आधीच बघितला होता, आज परत बघून डाउनलोड करून ठेवला :)

हेरंब said...

'थोडासा रुमानी... ' मधली बारिशकरची ती कविता जबरदस्तच आहे. मला प्रचंड आवडते ती. इथे फिलीच्या संमेलनातहि त्याने ही कविता म्हटली होती..

'थोडासा रुमानी... ' बघितला नाहीये. थोडा स्लो आहे किंवा आर्टफिल्म टाईप वगैरे म्हणून. आणि बऱ्याच जणांकडून ऐकलंय की थोडासा रुमानी सगळ्यांना आवडायचा चित्रपट नाही.. पण आता नक्की बघेन म्हणतो.

Raindrop said...

nana is someone I can just keep listening to and not get tired....of course you are crazier ;) about him I know :) thanks for sharing.

सौरभ said...

नाना, जेवढा रोखठोक आहे तेवढाच हळवा... पण है तो येकदम भारी... चला आज मी हा चित्रपट पाहून घेतो. बरंच ऐकुन होतो, पण विसरुन जायचो म्हणुन बघायचा राहून गेला. आज हमभी थोडेसे रुमानी हो जाते है... :)

THE PROPHET said...

मी खूप ऐकलंय, 'थोडासा रूमानी हो जाये' बद्दल.. बघतो वेळ मिळाला की!

संकेत आपटे said...

चला, झाले सगळे लेख वाचून. ही शेवटची प्रतिक्रिया. आता पुढची प्रतिक्रिया पुढच्या लेखावर. फिर मिलेंगे ब्रेक के बाद. :-)

rajiv said...

छ्या ! मुंबईतला पाऊस काही संपतच नाही. त्याला ना ना म्हणायची वेळ त्याने आणलीय बुवा !

पण हा नानावाला `पाऊस' मात्र खूपच सुंदर व हवाहवासा आहे . मंडळास सहभागी केल्याबद्दल आभारी !

सौरभ said...

झाला पाहून चित्रपट. १० भागात आहे पण रत्येक दोन भागांमधे थोडा चित्रपट कापला गेलाय. हे अमोल पालेकर म्हणजे एक वेगळंच रसायन आहे. इतका साधा चित्रपट काढून एक महत्वाचा आणि खुप मोठा संदेश सहजतेने पोहोचवतात. "समांतर" चित्रपट पाहिला का?? नसल्यास कधी वेळ काढून पहा. छान आहे तोपण.

अनघा said...

सुहास, सही आहे ना मुलाखत? :)

अनघा said...

हेरंब, नक्की बघ. आहे हळू नक्की. 'मुश्कील है जीना, उम्मिद के बिना...' सुंदर....कविता सरळ साध्या आणि सुंदर आहेत. सिनेमाच एकूण साधा सरळ आहे. परंतु, अर्थपूर्ण. ढिंच्यॅक मात्र काहीच नाहीये. :)

अनघा said...

वंदू, अगं, काल दिवसाभरात मी कित्ती वेळा बघितली ही मुलाखत! वेळ मिळेल तेव्हा! आणि काय ग? माझं मनचं गूज असं जगजाहीर काय करतेस?! ;)

अनघा said...

सौरभबुवा, झालात का आपण थोडेसे रुमानी?! :)

अनघा said...

संकेत, खूप खूप धन्यवाद! इतक्या धीराने (patiently च मराठीत हेच भाषांतर होईल का? :) आणि समजुतीने!) सगळं वाचल्याबद्दल! आणि सगळ्यांवर प्रतिक्रिया दिल्याबद्दल! :)

अनघा said...

विद्याधर, मला आशा आहे कि तो चित्रपट तुला आवडेल. साधी सरळ गोष्ट आहे. :)

अनघा said...

:) राजीव, तुम्हीं पण बघून टाका पाहू 'थोडासा रुमानी!' :)

अनघा said...

सौरभ, राहून गेलेला आहे 'समांतर'... :(

panda said...

सुरेख विडियो आहे....आधी बघितला होता...पुन्हा पुन्हा बघितला तरी मन भरत नाही.."थोडासा रूमानी..." बघायचा होताच बऱ्याच दिवसापासून.....या post ने catalyst चे काम केले...लगेच बघितला. धन्यवाद!!!

अनघा said...

पांडा, मला आशा आहे की चित्रपट तुम्हांला आवडलाच असेल. :)

श्रीराज said...

अनघा तुला खरं सांगू.. एखाद्या 'फ्रेम'मध्ये नानाच्या निव्वळ असण्याने सुद्धा खूप फरक पडतो...शाळेत असताना तर मी त्याचे बरेच फोटो जमवले होते.

असो.. हा चित्रपट मी नक्की पाहीन.