नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 16 December 2010

स्त्री स्वातंत्र्य

"बँकेत आलंय बरं का माझं पेन्शन."
मला खरं तर कळलं नाही की हे मला का सांगण्यात आलंय. आणि म्हणून बहुधा एक प्रश्र्नचिन्ह माझ्या चेहेऱ्यावर उमटलं असावं.
"नाही, तू तो मी दिलेला 'जिवंत असल्याचा दाखला' पाठवला होतास ना माझ्या ऑफिसकडे."
"हं हं.' पुटपुटले.

हा संवाद मायलेकींमधला. म्हटलं तर काही विशेष नाही आणि म्हटलं तर खूप खास आहे. त्यात भारतातील स्त्रियांचा एक प्रवास आहे.

वयाच्या १९व्या वर्षापासून आधी भावाला मदत म्हणून आणि मग स्वत:च्या संसाराच्या गाडीचे एक चाक म्हणून, नोकरी केली. मुलींना वाढवलं. शिकवलं. आणि स्वत:च्या धडपडीतून आर्थिकदृष्ट्या खंबीर होण्याचं बाळकडू नकळत आपल्या तीन मुलींना पाजलं.

आज ज्यावेळी सोन्याचा चढता भाव बघून माझ्या पोटात गोळा येतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही श्याहत्तर वर्षांची बाई जाऊन नातीसाठी आणि आपल्या दोन मुलींसाठी सोनं खरेदी करते.
"बँकेत नुसतं पडून राहिलंय पेन्शन. म्हणून मग सोनं घेतलं!"
हिची कॉलेजला जाणारी नात, आई विसरून गेली कि जेव्हां आजीसमोर उभी रहाते, "आजी, पैसे दे ना! आई विसरलीय" त्यावेळी ही ज्या अभिमानाने पैसे नातीच्या हातावर ठेवते, त्यावेळी तिने तेच बाळकडू नातीला पाजलेले असते. आणि नातीला देखील आजीकडून पैसे घ्यायला काय मजा वाटते! नात मागेल तितके पैसे ही तिच्या हातावर ठेवते! आजी खूष आणि नात खूष!
बाजारात जाऊन गगनाला भिडलेले कांदे, भाजी, मासे ही खरेदी करून येते आणि मग पुटपुटत बसते,"केव्हढं महागलंय सगळं!" तेव्हा मला खरं तर माहित असतं कि काही गरज नाहीये की तिने जाऊन ही छाती दडपवून टाकणारी खरेदी करावी. पण तिला त्यात स्वावलंबनाचा, निर्णय घेण्याच्या शक्तीचा, जो आनंद मिळतो त्यास तोड नाही.

कोणा एका स्त्रीने स्वकमाईने...तर कोणा दुसरीने, नवऱ्याने दर महिना दिलेल्या पैश्यांतून बचत करत करत...स्वाभिमानाचा हा भक्कम किल्ला उभारलेला असतो.

भारतीय स्त्री स्वातंत्र्याचा हा एक पैलू. जसा एखादा हिरा.
त्याचा पैलू क्षणात चमकून उठणारा.
आणि आशेचा तो तेजस्वी किरण झपाट्याने क्षितीजापर्यंत झेपावणारा.
कोणा दुसऱ्या स्त्रीला अंधारात निश्चित मार्ग दाखवणारा.

22 comments:

rajiv said...

अर्थार्जनाच्या स्वावलंबना बरोबरच त्याच्या विनियोगाचे स्वातंत्र्य स्त्रीच्या हातात असणे हे `सुजाण' कुटुंबाचे व समाजाचे लक्षण आहे !!

Anagha said...

खरं आहे राजीव.

Shriraj said...

राजीवजींच्या मताशी मी पूर्णपणे सहमत!!!

Anagha said...

:) खरंय श्रीराज.

हेरंब said...

"माझ्याकडे म्हातारीकडे कुठले मेले पैसे आलेत.. तुम्ही मला देता तेच मी तुम्हाला लागतात तेव्हा परत देणार" असं म्हणत आम्ही मागू तेव्हा दर वेळी पैसे काढून देणाऱ्या माझ्या आजीची आठवण आली..

Anagha said...

आम्हीं कुठून कुठे आलो...नाही का हेरंब? 'घेत्या'च्या 'दात्या' झालो. :)

सौरभ said...

राजीवकाका +१ :)

भानस said...

राजीव यांच्याशी सहमत.

नक्कीच घेत्याच्या दात्या आपण कधीच्याच झालोत गं. गेल्या काही पिढ्या सर्वार्थाने दात्या झाल्यात हे खरोखरच अभिमानास्पद.

माझ्या आईची प्रकर्षाने आठवण येतेय.

तृप्ती said...

हे खूप गोड लिहिलय तुम्ही. मला आजीने नाही पण आईने असेच वेळोवेळी पैसे दिलेत, कधी स्वकमाईचे तर कधी असेच बाजूला ठेवलेले.

राजीव ह्यांना अनुमोदन.

Anagha said...

प्रतिक्रियेबद्दल आभार सौरभ. :)

Anagha said...

भाग्यश्री, अभिमान वाटतो ना समस्त स्त्रीजातीचा....काही वर्षांपूर्वीचीच तर गोष्ट आहे...शिक्षण मिळत नव्हतं, बालविवाह होते, सती जाणे होते...कायकाय नव्हतं? आणि आज तिथेच ताठ मानेने स्वत:च्या पायावर उभे आहोत... :)

Anagha said...

:) आभार गं तृप्ती.

Anonymous said...

तुझी पोस्ट कालच वाचली होती, पण कमेंटू काय काय ते कळत नव्हते, माझ्या दोन्ही आज्या, आई आठवत राहिल्या पुर्ण वेळ, नौकरी केलेल्या आणि अश्याच पटकन पैसे काढून देणाऱ्या ... :)

आवडली तुझी पोस्ट...

Anagha said...

:) धन्यवाद गं तन्वी. मी आपला घेतलेला धडा म्हणजे, मलाही हे शेवटपर्यंत आर्थिक स्वावलंबन जतन करायला हवं! उगाच लेकीसमोर आणि जावयासमोर (!!) हात नको पसरायला! :)

Raindrop said...

ani naatichya hataat paise thevtana kiti shaj look asto aajichya cheharayavar...not like parents who make a big deal out of 'bagh 200 dile aahet haan'....aaji dete hataat paise, smile karte ani kamala lagte.

Anagha said...

अगं वंदू! हा मला टोमणा मारलायस का गं?? :)

Raindrop said...

nahi ga...mala majhe baba athavale...200 rs petrol money for the whole month for my Lal chuttukk Luna :) ani kitti lecture :)

Anagha said...

hmmmm :)

अपर्णा said...

अगदी खरंय गं...कितीजणी अशा काय करायचंय आम्हाला बाहेर काम करुन म्हणतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की इतकं त्या कुणावरही कशा काय विसंबुन राहू शकतात??

Anagha said...

अपर्णा, आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन ह्या दोन गोष्टी नेहेमीच मानसिक बळ देखील देतात नं? :)

THEPROPHET said...

अगदी जवळचं उदाहरण घेऊन स्पष्ट केलंस त्यामुळे एकदम भिडलं मनाला :)

Anagha said...

मला आशा आहे विद्याधर आणि असा प्रयत्न आहे कि मीही माझं आर्थिक स्वातंत्र्य असंच शेवटपर्यंत राखू शकेन! :)