नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 7 December 2010

लालचुट्टूक

"लिपस्टिक लावून आलीयस तू कॉलेजला?"
सरांचा सूर नाराजीचा होता. शिक्षकांच्या खोलीत सतरा वर्षांची मी, समोर उभी.
"नाही सर!"
त्यांनी भुवया उंचावल्या.
"ते ना, काय केलं माहितेय का मी?"
"काय केलंस? लाल लाल लिपस्टिक फासलयस ना?"
"नाही सर! ते ना, ओठ ना, असे घट्ट बंद करायचे आणि ना त्यावर जीभ फिरवत रहायची! खूप वेळ!"
"मग हे असं होतं का? आणि तुला कोणी सांगितलं हे?"
"ते मीच शोधलंय सर! बाबा देत नाहीत ना लिपस्टिक आणायला घरात!"
"व्वा! ध्यान दिसतंय पण ते! अजिबात बरं दिसत नाहीये! बाबा ओरडतात ते बरोबरच आहे! लहान आहेस अजून तू हे उद्योग करायला!"
"बरं सर. पण ना, हे ते असं लिपस्टिकसारखं पुसून पण नाही टाकता येणारेय मला!" जाडजूड चष्म्याआड असले म्हणून काय झालं? डोळ्यात पाणी येतंच!
"ठीक आहे. जा आता वर्गात."

"आई, हे बघ ह्यातलं कुठलं बरं दिसतंय?"
पालथ्या हातावर सहा सात वेगवेगळ्या रंगांच्या जाड्या रेघा ओढून तो हात माझ्यापुढे धरण्यात आला होता. हात लेकीचा.
"हे ते ब्राऊन काही आवडत नाहीये हं मला! म्हातारी झालीयस का?"
"आई, मी अजिबात लाल लाल लिपस्टिक लावणार नाहीये!"

कम्मालेय! कित्ती वेळ जायचा माझा ते ओठ बंद करून लालचुट्टूक ओठ मिळवायला!
काही वर्षांपूर्वीचीच तर गोष्ट!
Generation gap I tell you!
:p19 comments:

दीपक परुळेकर said...

ह्म्म! सही आहे आयडीया! खरंच असं होतं का? पण मुली इतका वेळ ओठ बंद करुन राहत नसतिल म्हणुन लिपस्टीकचा शोध लागला असेल ! हे हे हे!! :)

हेरंब said...

>> हे ते असं लिपस्टिकसारखं पुसून पण नाही टाकता येणारेय मला!

जाड चष्म्याआडचं पाणी का? ;)

अनघा said...

hehe! That's a good one Deepak! :D

Writer & Filmmaker - said...

Awww so cute...I remember this and thought I was the only one doing this :) the press lips lipstick and the sketch pen kajals :)

अनघा said...

:D हेरंब, बरं झालं मला मुलगीच आहे! जास्ती मजा येते मला! :)

अनघा said...

वंदू, तुला पण नाही द्यायचे ना काका हे प्रकार करायला?! मज्जा! बाबा कपाळाला टिकली लावल्याशिवाय पण बाहेर नाही पडू द्यायचे! :)

सौरभ said...

हाहा, दीपक +१
लिश्पटीक मुळात कशाला लावतात तेच समजत नाही मला. पोरींना हि रंगरंगोटीची लईभारी खोड असते राव... ब्येक्कार येकदम...

अनघा said...

हो का सौरभ, आणि मग सो.कु.काय भारी दिसतेय असं कोण सारखं म्हणत असतं!? :)

भानस said...

अनघे, आयडिया एकदम भारीच लढवत होतीस गं. :D टिकलीलाही आक्षेप होताच सुरवातीला...

अनघा said...

:D भाग्यश्री, घरोघरी मातीच्या चुली दिसतायत! नाही का?! :)

THE PROPHET said...

दीपक +१
सौरभ +१
आणि (आठवा परवाची कॉमेंट) एक नुसताच +१ :D

संकेत आपटे said...

‘छान, सुंदर, मस्त' ;-)

अनघा said...

विद्याधर, हे + १ बघून ना मला रोज एक मराठीचा पेपर दिल्यासारखं वाटतंय! म्हणजे बाई फक्त मार्क देतायत आणि त्यावर बोलत काहीच नाहीत! मग बसायचं जाऊन बाकावर गुपचूप! :(
:)

अनघा said...

ओ संकेत मास्तर, तुम्हांला पण हेच म्हणायचय मला! :)

सिद्धार्थ said...

दीपक +१
सौरभ +१
संकेत +१

अनघा said...

सिद्धार्थ, धन्यवाद! :)

रोहन चौधरी ... said...

पुन्हा तेच तेच घडतंय... सर्व प्रसंग थोड्याफार फरकाने पुन्हा आपल्या आयुष्यात येतात... उगाच देजावू झाल्यासारखे पण वाटत राहते.. :)

अनघा said...

रोहन, असं प्रसंग कुठून आला तुझ्या आयुष्यात?! :)

रोहन चौधरी ... said...

असा नाही गं.. पण असे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतेच ना.. :)