नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday 1 December 2010

कुक्कुक!

हे सगळे जालावरचे प्रकार ना अगदी गोंधळात टाकणारे असतात.

आम्ही लहानपणी नाव, गाव, फळ, फूल हा खेळ खेळायचो. म्हणजे प्रत्येकाने एक एक कागद घ्यायचा. शाळेच्या गेल्या वर्षीच्या वहीचा घेतलात तर बरं, कारण ह्याच वर्षीचा घेतलात तर मग कालांतराने सगळी वहीच रिकामी आणि खिळखिळी होते. तर असो. कागदावर विभाग पाडा. विभागाला एकेक नाव द्या. म्हणजे...नाव, गाव, फळ, रंग, वस्तू, प्राणी...इत्यादी इत्यादी. मग कोणतेही एक अक्षर मोठ्याने बोला. आणि मग त्या अक्षराला धरून त्या प्रत्येक विभागात शब्द टाका. म्हणजे 'क' घेतलात तर नाव- कमला, गाव- कोल्हापूर, फळ- केळं, फूल- केवडा वगैरे वगैरे. ज्याचं पहिलं लिहून होतं तो जिंकतो! आणि मग सगळ्यांचे कागद तपासले तर फक्त हे वेगवेगळे शब्द. म्हणजे अगदी बाराखडीचा तक्ता. मग तो तक्ता सुजाताचा असेल, रश्मीचा असेल, नाही तर असेल अनघाचा!

तर त्याचं आता काय?

त्याचं असं की मला ही जालावरची वेगवेगळी प्रोफाईल छायाचित्र बघून त्या तक्त्त्यांची रोज आठवण होते! त्या खेळाची उजळणी! म्हणजे बालपणी शब्दांची ओळख त्या खेळात होत होती. आणि आता त्या शब्दांची चित्र समोर येतात.

मग मी कधी एखाद्या फुलाशी गप्पा मारत असते, कधी एखाद्या बॉलीवूडच्या नायकाशी, कधी कावळ्याशी तर कधी मांजरीशी! अगदी घाबरवून टाकणारे वाघ आणि सिंह देखील असतात! जबडा वासून! एकदम एखाद्या जंगलात आल्यासारखंच! :( समोर ना सुजाता, ना रश्मी. मग मला कळतच नाही की ही पोस्ट वाचताना ह्याचा किंवा तिचा चेहेरा कसा होईल? कारण मी कधी पाहिलाच नाहीये त्याचा/तिचा चेहेरा!

हे म्हणजे क्लायन्टला एखादी स्क्रिप्ट फक्त मेल करून टाकणे! आणि त्याच्यासमोर बसून, त्याच्या चेहेऱ्यावर हलणाऱ्या रेषा बघत प्रेझेन्ट करणे नव्हे! अगदी स्क्रिप्टला साजेसा आविर्भाव करत. इथे निदान त्या माझ्या क्लायन्टला मी कधी ना कधी भेटलेले तरी असते! म्हणजे मला माहितेय की जालावर काहीही झालं तरी मला हावभाव बघायला नाहीच मिळणार आहेत! पण हे म्हणजे भारीच नाही का? मी आपली गप्पा मारतेय आणि माझ्या समोर कोण तर चिमणी, अस्वल, फूल किंवा कधी एखादं टेबल!

नसेलच पटलं ना तुम्हांला?!
श्यॅ!
:(
:p

22 comments:

Deepak Parulekar said...

ओय! आम्ही पण खेळायचो लहानपणी!
फार मज्जा यायची !

Gouri said...

ह्म्म ... माझ्या प्रोफाईलमधलं फूल आहे ना, त्याचा चेहेरा तुझ्या पोस्ट वाचताना एकदम खूश असतो बरं का ;)

माझ्या मते ब्लॉगवर मर्यादित वैयक्तिक माहिती टाकलेली चांगली. ब्लॉग ही शेवटी एक पब्लिक फोरम आहे. इथे छान मित्र मैत्रिणी मिळू शकतात,तसंच नको असलेले, माहितीचा गैरवापर करणारे, बदनामी करणारे, फसवणूक करणारे लोकही असू शकतात. ज्या ठिकाणी आपण समोरच्या व्यक्तीचं खरं नाव-गाव-संपर्कपत्ता-भेटीमागचा उद्देश पडाताळून बघू शकत नाही, तिथे आपली पूर्ण माहिती देऊ नये. इथल्या संवादातून पुढे छान मैत्री झाली तरच आपण आणखी माहिती शेअर करावी.

हुश्श ... एवढी भली मोठ्ठी कॉमेंट लिहिली, आणि पोस्ट होताना एरर आली पहिल्यांदा :(
झाली बुआ पुन्हा टायपून.

Anagha said...

नाव, गाव, फळ, फूल ना दीपक? अगदी सामान्यज्ञान वाढवणारा खेळ. नाही का?? :)

Anagha said...

खरंच आहे गं! पण मी सारखी शोधत असते हं गौरी तुझा चेहेरा!!! :)

Deepak Parulekar said...

हो रे ! आम्ही बरेचजण मिळुन खेळायचो! मला नेहमी फुलांचे नाव आठवायचीच नाहीत! मग मी मुलींची नावे लिहायचो आणि मुली म्हणजे फुलंच असतात की नाही हे सगळ्यांना पटवून द्यायचो !! हे हे हे

BinaryBandya™ said...

मी तर चेहरा लपवूनच उभा आहे ...

Anagha said...

:( हो ना! का बरं असं केलंयस तू बायनरी बंड्या? :)

हेरंब said...

हाहाहा.. जबरी आयडियेची कल्पना आहे ही पोस्ट म्हणजे.. आम्ही नाव, गाव, फळ, फुल खेळताना आधी सगळं ठरवून ठेवायचो आणि मग अक्षर द्यायचो. अर्थात ठरवलेलं असल्याने आपलं एका मिनिटात लिहून होतं.. स्पॉट फिक्सिंग यु नो..

आणि प्रोफाईलचं म्हणशील तर माझा चेहरा तर सगळीकडे एकच असतो.. ब्लॉग, प्रोफाईल, चॅट :) (कुठे कलर तर कुठे BW.. एवढाच फरक).

Anagha said...

दीपकभाऊ, मुलाचे पाय पाळण्यातच दिसत होतें वाटतें? (अनुस्वार लक्षात घेऊन उच्चार करण्यात यावा! :p) :)

Anagha said...

भारी बुवा तुम्ही हेरंब! पण मग जिंकायचं कोण आणि हरायचं कोण?! आणि तुझा फोटो म्हणशील तर आहे खरा हाच तुझा फोटो सगळीकडे! मान फिरवून बसलेला! :p

भानस said...

गेल्याच महिन्यात भाच्यांबरोबर अड्डा जमवून हा खेळ खेळत होतो. हेरंब म्हणतो तसे चिटिंग करत... हा हा.

Anagha said...

लब्बॉsssड! :) धन्यवाद भाग्यश्री!

सौरभ said...

हमार बारे में क्या कैना है मैडम???

Anagha said...

हम आप के बारे में क्या बोलेंगे सौरभ भाई? आप तो गुरु है! :)

BinaryBandya™ said...

चेहरा आणि नाव लपवून मनात येईल ते लिहिता येते ..
असे असेल कदाचित ...

THEPROPHET said...

प्रभुजी मिथुनदांना फार आवडतात बरं का तुमच्या पोस्ट्स!! :)

Anagha said...

hmmm. बायनरी बंड्या! :)

Anagha said...

अरे व्वा! साक्षात मिथुनदांनी दिली की पावती! ;)

Raindrop said...

i agree with a lot of people when they say only limited mahiti dyayala havi...but just a low res pic of one's face is not going to cause any harm (hide all other details if one wishes...even the name).

When I reply to a flower or a cat pic I feel quite conscious as if main chaddi baniyaan mein hoon aur saamne wala parade mein :)

Anagha said...

hehe! Vandu! That's funny! :)

रोहन... said...

पुढच्या वेळी आपण सर्व भेटू तेंव्हा एकदा सर्वजण हां खेळ खेलूया... :D

Anagha said...

:D