नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 20 November 2010

PTA

Post Traumatic Amnesia -An example of mixed retrograde and anterograde amnesia may be a motorcyclist unable to recall driving his motorbike prior to his head injury (retrograde amnesia), nor can he recall the hospital ward where he is told he had conversations with family over the next two days (anterograde amnesia)...

सकाळची नऊची वेळ. आज कधी नव्हे ते वेळेवर निघणे झाले होते. खारच्या ऑफिसला साडे नऊ वाजता पोचणे काहीच कठीण नव्हते. वांद्रा रेक्लमेशनचा सिग्नल दुरून दिसत होता. वाहन कायनॅटिक होतं. सवयीनुसार शिरस्त्राण परिधान केलेले होते.

स्ट्रेचर अम्बुलन्समधून काढले जात होते त्यावेळी शुद्ध आली. उलट्या आणि ग्लानी. डोक्याला मार. हिंदुजाचे ICU. चार दिवस मुक्काम. उलट्या म्हणून सिटी स्कॅन.

सांगितले जाते ते असे...स्कूटरला अपघात झाला होता. भर रस्त्यावर विसेक मिनिटे पडले होते. शुध्द हरपलेली होती. कोणीही थांबत नव्हते. मागून लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर महेश तिथून डाव्या बाजूला वळणारच होते, त्यावेळी त्यांना गर्दी दिसली. ते उतरले. गाडीत घातले आणि भाभा हॉस्पिटलमध्ये नेले. पर्सबरोबर असलेल्या फायलो फॅक्स मध्ये कोणा माणसाला घरचा नंबर सापडला. त्याने घरी फोन केला तेव्हा मधल्या मेव्हण्याने फोन उचलला. पुढच्या पंचविसाव्या मिनिटाला तो मित्राला घेऊन भाभात पोचला होतं. त्याने बघितले त्यावेळी डोक्याचे ऑपरेशन चालू होते. म्हणे जो ऑपरेशन करत होता तो दुरून तरी सर्जन वाटत नव्हता. त्यानंतर डॉक्टर महेशांनी हिंदुजाला आणले. अम्बुलन्समधून बाहेर काढले जात असता शुध्द आली. हिंदुजा हॉस्पिटलच्या आवाराचे छत अंधारलेले आहे.

कपडे पूर्ण फाटलेले. लक्तर रक्ताने माखलेली. उलट्या चालूच. बेशुद्ध असताना आजूबाजूच्या लोकांच्या कृपेने पर्स पूर्ण रिकामी झालेली होती.

कोणी एक वाटसरू बातमी घेऊन घरी पोचला होता. लेक पाच वर्षांची होती. तिला आणि आईला सांगितले गेले त्यावेळी आई की मावशी हा प्रश्न आजीला आणि नातीला पडला. मी आणि माझी धाकटी बहिण, दोघी स्कूटर घेऊन कामावर जात असू. नशिबाने अपघात मलाच झाला होता.

सिटी स्कॅनने मेंदू जागच्या जागी आणि शाबूत दाखवला. सात दिवसांनी घरी पोचले. पंधराव्या दिवशी पुन्हा स्कूटर हातात घेतली. मेंटल ब्लॉक परवडण्यासारखा नव्हता.

लेकीने एक सुंदरसं भेट कार्ड बनवलं. ते बघून लीलावतीचे डॉक्टर महेश आणि आईला वाचवणारे डॉक्टर बघून लेक, असे दोन जीव सुखावले.

आजतागायत माहित नाही हे घडलं कसं. का रस्त्यावर काही सांडलं होतं? का त्यावरून माझी स्कूटर घसरली? कि कोणी मला उडवलं? गूढ. बारीक केसांतून दिसणारी आणि रोज हाताला लागणारी एक शिवण. हा एव्हढाच त्या अपघाताचा पुरावा.

Post Traumatic Amnesia - अपघातानंतर माणसाला त्या घटनेबद्दल काहीही न आठवणे.

आयुष्यात आघात बरेच झाले. ते नाही विस्मृतीत गेले. जखमा बऱ्याच झाल्या. त्या कायम ओल्याच राहिल्या.

नेहेमीसारखेच आयुष्य पुढे सरकले. सकाळची नऊची वेळ. नेहेमीसारखाच उशीर. ऑफिसला साडेनऊ वाजता पोचणे कठीणच. अपघाताच्यावेळी केलेली चूक आज सुधारली होती. शिरस्त्राण घातलं होतं आणि त्याचा पट्टा देखील आज लावला होता.

18 comments:

Deepak Parulekar said...

वाचुन सरकन काटा उभा राहिला अंगावर !

नशिबाने अपघात मलाच झाला होता.+++
बारीक केसांतून दिसणारी आणि रोज हाताला लागणारी एक शिवण. +++

U Are Great !!

Anagha said...

दीपक, मला वाटतं, आयुष्य हे एक personality development चा course आहे! हो ना? :)

Deepak Parulekar said...

Very True !!
And The R & D related to this course is always going on with the life!!

Hope I'll get at least pass class in this course !! :)

TC

हेरंब said...

बाप रे !! जाम भयंकर.. सहीयेस तू.. मानलं तुला.. ! कधी झालं होतं हे सगळं?

>> त्याचा पट्टा देखील आज लावला होता.

मला तर शेवटपर्यंत कळलंच नव्हतं नक्की चूक काय झाली. शेवटचं वाक्य वाचल्यावर कळली चूक. काही काही गोष्टी आपण किती गृहीत धरतो ना?

सौरभ said...

दुचाकीवरचे अपघात तसे डेंजरच!!! माझापण एकदा अपघात झालेला बसमधे असताना. बसने मस्तपैकी ४-५ कोलांट्या खाल्ल्या. तो अगदी जसाच्यातसा आठवतोय. लय कॉमेडी अपघात होता तो माझ्यासाठी. :D :D

Anagha said...

हेरंब, उलटली आता काही वर्ष. पट्टा लावणे महत्त्वाचे. स्कूटरवर असू वा गाडीत! :)

Anagha said...

तरी मी विचारच करत होते कि आता ह्यावर सौरभबुवा काय डोकं चालवतील! सांगा आता एक दिवस आम्हांला तुमचा कॉमेडी अपघात! :)

Anagha said...

दीपक, पास क्लास का अगदी फर्स्ट क्लास मिळेल बघ तुला! :)

Shriraj said...

अनघा तुझ्यासोबत एवढं काही घडलं असेल याची मला पुसटशी देखील कल्पना नव्हती.

देवाचे आभार त्याने आमच्या अनघाला धडधाकट ठेवले.

आयुष्यमान भव!

Anagha said...

धन्यवाद श्रीराज! :)

Raindrop said...

azach bhandle me navryashi ke mala scooty ghyayachi aahe ani to mhanala havi tar gaadi ghe pan no two wheeler...zoratach vazla zara ani tu he asa lihtes....atta tari 100% nahi yenar majhi scooty :(

but sahi mein...who stops these days for road accident victims?? your gesture for the doc was so sweet too :)

do u know...now a days there is no rule that one has to take the road accident victim to a sarkari hospital first....all hospitals are directed to treat patient first and then look into paperwork. must spread this message.

Anagha said...

नकोच घेउस वंदू तू स्कूटी! गाडी घे पाहू तू आपली! आणि खरंच हे सरकारी हॉस्पिटलबद्दल कळायलाच हवं लोकांना!

अपर्णा said...

अनघा जबरदस्त गं.....कसं काय सावरलंस काय माहित...मला कधीकधी वाटतं मनाचे घाव भरायला जास्ती वेळ द्यावा लागतो..त्यासाठीचा पेशन्स आपल्या भोवतीच्या लोकांमध्येही असावा लागतो..पण तू लवकर सावरलीस..
पट्ट्याचं म्हणशील तर अमेरिकेने ही एक चांगली सवय मला लावली आहे.....आता मी कुठेही गाडीत बसले की माझ्याही नकळत तो पट्टा बांधला जातो...

THEPROPHET said...

अंगावर काटा आला वाचून...
मला सुचत नाहीय काही लिहायचं..

Anagha said...

अपर्णा, खरंच हे पट्टा लावणं आपल्याच भल्यासाठी आहे हेच विसरतो आपण! धन्यवाद गं. :)

Anagha said...

विद्याधर, वाचल्याबद्दल आभार. :)

रोहन... said...

धन्य आहेस... काय बोलू आता... तू आता कारने जातेस ना कामावर?

Anagha said...

:) हो, गाडीनेच विहार करत असते मी आता रोहन. आभार प्रतिक्रियेबद्दल.