नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 15 November 2010

सैरावैरा

कोंदट खोली.
अंधारलेली.
बिन खिडक्यांची.
बिन दारांची.

लक्ष आकृत्या...
बोथटलेल्या
तापलेल्या
भरकटलेल्या
उसळलेल्या
वहावलेल्या
दबलेल्या.
सैलावलेल्या
निर्ढावलेल्या
षंढलेल्या
वांझोट्या
दुखावलेल्या...

आवरा!
अनिवार भावनांना आवरा!

12 comments:

Gouri said...

का ग?
तुझी पोस्ट एकदम गच्च भरून आलेल्या आभाळासारखी वाटातीय - जोरदार सर येऊन सगळं मळभ धुवून जायला हवंय का?

Anagha said...

असंच वाटलं गं, कोणाच्या भावना कधी दुखावतील ना त्याला काही ताळतंत्रच नाहीये!

THEPROPHET said...

नभ दाटून आलं आणि मग...
एकदम 'आवरा'!!! :D

Anagha said...

:)

Anagha said...

सैरावैरा' लिहिताना माझ्या मनात हल्ली जो सगळीकडेच भावनांचा उद्रेक दिसत असतो ते मनात होतं...फक्त माझ्या स्वतःच्या भावना नव्हत्या मनात. कदाचित माझ्या लिखाणात हे स्पष्ट नाही झालेलं. :(

Raindrop said...

tip tip barasa baani...aur bhara hua gala clear ho gaya. these little posts of urs are the little drops of rain which clear the bharlela abhaal....slowly one drop at a time.

सौरभ said...

भावना झाल्या सैरावैरा (वाह!! वाह!!)
भावना झाल्या सैरावैरा,
त्यातुन जीव झाला कावराबावरा (क्या बात है!!!)

भावना झाल्या सैरावैरा,
त्यातुन जीव झाला कावराबावरा
सहा एक्के सहा, सहा दुणे बारा,
माझी चारोळी संपवतो, आता मला कोणीतरी आवरा

(याल्ला याल्ला माशाअल्ला!!! once more once more!!!)

Anagha said...

हेहे! सौरभ! टाळ्या टाळ्या!! :)

Anagha said...

वंदू, मी आम जनतेला अनुसरून लिहिली होती पोस्ट!! मी काही लिहिलं कि ते मलाच येऊन लागतं!! :( :)

Shriraj said...

अधून मधून त्रास देणाऱ्या अशा कोंदट खोल्या सगळ्यांकडेच असतील ना?!

रोहन... said...

शेवटून दुसरा आणि तिसरा शब्द बसला नाही.. जचला नाही... :)

Anagha said...

धडाधड वाचताय की रोहनबुवा तुम्हीं! धन्यवाद!:)