नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 15 November 2010

"उक उक!"

चांगलीच जुनी गोष्ट. पण न विसरता येण्यासारखी.
लेक पृथ्वीतलावर अवतरून फक्त दोनच दिवस झालेले. आता ती सांगते ते जर खरं मानायचं, तर म्हणे जवळजवळ पाच वर्ष ती स्वर्गात देवाजवळ बसून संशोधन करत होती. सर्व जगभर निरीक्षण करून तिने तिचे आईबाबा निवडले होते! असो.
तर वेळ होती सकाळचे अकरा. सरोज नर्सने धुऊन पुसून माझ्या बाजूला बाळाला झोपवलं होतं. खरं तर बाळ का बरं म्हणावं? तो दुपट्यात गुंडाळून आणलेला प्राणी होता सुरवंट. सुरवंट कसा वळवळतो? तसंच हलत होतं बाळ. हातपाय आत, फक्त डोकं बाहेर. वळवळ वळवळ! बाळाबाजुला पडायचं म्हणजे पण चिंताच. उगाच आपला हात पडला म्हणजे चुकून त्याच्या अंगावर? चिंचोळ्या जागेत पडून टक लावून बघत होते त्या बाहुलीकडे. श्वासाकडे नजर लावून.
"उक!"
ताडकन उठले. अगदी बिछान्यावरून जमिनीवर!
"उक"
हे काय होतंय बाळाला?
डोळे तर मिटलेलेच. मग हे काय?
"उक!"
"नर्स! नर्स!" खोलीतून बाहेर आले ती मुळी सुसाट शोधात सरोज नर्सच्या. कोणी चिटपाखरू देखील नव्हते आजूबाजूला. "नर्स! नर्स!" आवाज चढला. सुरवंटाला बिछान्यावर एकटंच ठेवून आले होते. परत धावत आले. डोळे मिटलेले. विचित्र आवाज चालूच!

हादरले. धावाधाव. तब्बल दहा मिनिटे धावपळ. रडायला सुरुवात केली तेंव्हा कुठे दिसली सरोज. ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येताना.
"काय ग? काय झालं?"
"कुठे होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हांला!" रडतरडत त्यांना जाब विचारला.
"अगं, पण झालं काय?"
"चला तुम्ही लवकर! माझ्या बाळाला बघा काय झालंय! श्वास नाहीये घेत ती नीट!"
"श्वास नाही घेत? असं कसं होईल? मी तुला आणून दिली तेंव्हा ठीक तर होती!" सरोज आमच्या खोलीकडे निघाल्या. मागे मी.
पोचलो. हिचं आपलं अजून चालूच!
"बघा ना हो कसं करतंय माझं बाळ!" रडू आणि आसू...

सरोज कमरेवर हात ठेवून उभ्या. खूप बाळं आणि खूप बाळंतिणी हाताखालून गेल्या असल्या ना की ह्या नर्संच्या चेहेऱ्यावर कसा एक वेगळाच आत्मविश्वास साईसारखा पसरतो. सरोजनी तिच्याकडे बघितलं. मग माझ्याकडे. "काय करतेय ती?"
"तिला ना अहो श्वास नाही घेता येतेय! काय करुया आता आपण?" आता अगदी डोळ्यांतून धारा!
"हे कोणी सांगितलं तुला?"
"अहो दिसतच आहे ना ते! बघा ना श्वास अडकतोय तिचा! म्हणून असा आवाज येतोय ना!" काही कळतंच नाहीये ह्यांना. एव्हढंसं माझं बाळ! बिचारीला श्वास पण घेता येत नाहीये, आणि ह्यांचे प्रश्नच संपत नाहीयेत!
सरोज पुढे झाल्या. त्यांनी बाहुलीच्या अंगाखाली हात घालून तिला उचललं. खांद्यावर टाकलं, पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली.

"नुसती उचकी पण तुला कळत नाही का ग?"
उचकी? दोन दिवसाच्या सुरुवंटाला उचकी?
"म्हणजे तेच ना? तिला श्वास नव्हता घेता येत!"
"उगाच काहीतरी बोलू नकोस! साधी उचकी लागलीय तिला! थोडा वेळ फिरव तिला आणि हात फिरव पाठीवरून!"
मी फिरवू? अजून घेता कुठे येतंय पण मला हे बाळ? ते मान पण नाही धरत! डूगुडूगु! अशी पुरचुंडी मी घेणार कशी?
"मला नाही येत घेता!"
"येत नाही म्हणजे?"
रडू. अजून रडू.
"अगं, आता शिकायलाच पाहिजे तुला!"

तेव्हढ्यात खोलीचं दार उघडलं आणि तीन बाळांची माता आली आत! नातीला घ्यायला!
"काय झालं?"
"अहो, साधी उचकी लागलीय तुमच्या बाळाला आणि ह्या तुमच्या लेकीने अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घेतलं!" तक्रार नोंदवली गेली.


ह्या नर्सेसना ना काही दयामायाच उरलेली नसते! गेल्या आपल्या सगळ्या हॉस्पिटलभर माझी फजिती जाहीर करायला!

संध्याकाळी डॉक्टर मावशी आली ती मुळी हसतच!
"कसं गsss होणार तुझं?"

...पण जमलं खरं हळूहळू!
बाहुलीशी मैत्र जुळलं...
आणि आयुष्य जमून गेलं!





48 comments:

संकेत आपटे said...

मस्त लिहिलंय.

Anagha said...

धन्यवाद संकेत! आणि स्वागत आहे! :)

Deepak Parulekar said...

सिंपली ग्रेट !!
तुझी पोस्ट वाचली की काहीतरी लिहिण्याच्या उचक्या लागतात !
उक ! बघ लागली ना?? :)
खुप सुंदर लिहिलंस !!

हेरंब said...

हा हा हा.. कसलं भारी लिहिलंयस ग.. आमचं बाळ येईपर्यंत मीही चार हात दूर असायचो सगळ्या चिंट्या गँगपासून. बाळाने एन्ट्री केल्यापासून मात्र कुठून कोण जाणे पण एकदम जबरा आत्मविश्वास आला :)

सौरभ said...

बाळ आणि सुरवंट!!! पुढल्यावेळी कोणी चुकुन बाळ म्हणुन सुरवंट हाती दिला नाही म्हणजे मिळवलं!!! :-S

Anagha said...

चला दीपक भाऊ, कीबोर्ड हातात घ्या! :)आणि धन्यवाद. :)

Anagha said...

मग काय तर सौरभ! ते दुपट्यात गुंडाळलेलं बाळ सुरवंटच तर दिसतं! आणि आता फुलपाखरू! :)

Anagha said...

हो ना हेरंब? ही बाळं घ्यायची कामं मला अजिबात नव्हती जमत! धन्यवाद रे. :)

सौरभ said...

हाहाहा... ते गाणं माहितीये का?? "फुलपाखरु छान किती दिसते... फुलपाखरु..." कोणत्यातरी नाटकातलं गाणं आहे हे.

Anagha said...

नाटकात माहित नाही हा सौरभ! पण बालभारतीत होतं! :)

Raindrop said...

ur fulpakharu sundarach aahe haan...ani bechari la yet astil bharpur uchkya...kitti loka bolat aahet tichya baddal hya post war :)

Anagha said...

वंदू!! खरंच ग! विचारते बाईसाहेबांना! :)

BinaryBandya™ said...

मस्तच ...
छान लिहलय ...
अगोदर कापडात गुंडाळलेले सुरवंट आणि नंतर frock घातलेले फुलपाखरू .. भारी ...

Anagha said...

:) बायनरी बंड्या, धन्यवाद. सुरवंटच दिसतं कि नाही?

Soumitra said...

ashkya lihile ahes, aaichi maya kai aste te fakt aaich samju shakte , apratim tula maza tarfe trivar pranam karto keep writing

Anagha said...

सौमित्र, धन्यवाद रे! दिसतंय न तुला मी किती गोंधळ घातला असेल ते?? :p मला वाटलं, माझ्या बाळाचा श्वासच कोंडतोय!!! :)

Shriraj said...

हे वाचताना मला फेसबुकमधले तुझे काही जुने फोटो डोळ्यसमोर आले !!

नेहमी सारखंच सही लिहिलयस !!! :)

THEPROPHET said...

अप्रतिम लिहिलं आहे! सिंब्ली सुबर्ब!!
:))))

Anagha said...

श्रीराज, हे आई बनणं म्हणजे भलतंच कठीण आहे, हे मला तो प्राणी पहिल्यांदा बाजूला आणून ठेवल्याबरोब्बर जाणवलेलं! सोप्प नाहीये बुवा हे काम! :)

Anagha said...

विद्याधर, आभार! :)

THEPROPHET said...

@सौरभ,
आय ऍम वंडरिंग..
बाळ-सुरवंट कसा असेल एग्झॅक्टली! :P

Anagha said...

उद्या आता एक फोटूच टाकते माझ्या सुरवंटचा! :)

सौरभ said...

i dont kno wht to comment on th pic....

only a big big big SMILE :) :) :)

Suhas Diwakar Zele said...

अनघा, अप्रतिम लिहलयस..शब्द नाहीत बघ :)

>> विभि उत्तर मिळाला ना..खूप गोड दिसतय बाळ-सुरवंट..

Anagha said...

सुहास, धन्यवाद! :D

Anagha said...

सौरभ, धन्यवाद!! :D

THEPROPHET said...

I can't stop smiling!!!
:))))
किती गोड दिसतंय बाळ!!

Anagha said...

धन्यवाद विद्याधर! आहे ना बाळ-सुरवंट?! :)

Raindrop said...

aawwww n u also look like a kid only....baal vivah kiya tha ???

Anagha said...

हो ग वंदू! बालविवाहच ना?! :)

Anand Kale said...

एकदम सही...
मी अनुभवलं ते सगळं....
आमच्या उक उक च्या प्रतिक्षेत.. ;-)

Anagha said...

आनंद, बघंच मग तू प्रत्येक दिवस किती गंमतीशीर असेल!! म्हणजे बरेचदा धाबं दणाणतं! पण तरी overall effect मजेचाच असतो! :p

irawati said...

Agha!! Tuzhya kadevaracha survanta faarach goad disatay:-)

Anagha said...

हो ना इरु?! कस्सं गं गोड माझं बाळ! :p

Shriraj said...

:) Tumhi doghi kayam ashach god disat raha... amhala aytach nayan-sukh!! ;)

Anagha said...

काय रे श्रीराज??? काय झालं?!

Shriraj said...

काही नाही गं!! मला म्हणायचं होतं तुम्ही छान दिसता !!! :)

Anagha said...

धन्यवाद श्रीराज! :)

भानस said...

बाळ सुरवंट आणि आई सुरवंट मस्तच. :) बाकी पहिले काही दिवस कसली घाबरगुंडी उडत राहते. :D

Anonymous said...

मस्तच :).. मनापासून आवडलं किंबहूना दोन मुलांची आई असल्यामूळे म्हणं हवं तर पण तुझा प्रत्येक शब्द मी जगले आणि माझ्या पिल्लांचे उक-उक आठवले....
पहिल्यांदा मी जेव्हा या उक-उक ला उचकी म्हणाले होते ना, माझी आजी ओरडली होती, उचकी नव्हे ’वाढती’ म्हणतात त्याला म्हणून!! :)

हेरंब said...

आयला, सुरवंटाचा आणि आई-सुरवंटीचा फोटू आत्ता पहिला मी.. कसला झक्कास आलाय ग..

Anagha said...

सुरवंटी आणि आई-सुरवंटी!! :D हेरंब, मस्तच आहे शब्द!!

Bhagyashree said...

kasla goad ahe surwant?!
maza surwant hi same asach disat hota..
loved your blog !!

Anagha said...

भाग्यश्री, आभार गं भेट आणि प्रतिक्रियेबद्दल! :)

रोहन... said...

तुझी मुलगी वाचते का गं तुझा ब्लॉग??? :) ह्यावेळी तुला भेटायला मला तुझ्या घरी यायचे होते पण काही जमून आलेच नाही... :(

Anagha said...

:) रोहन, मॅडमची परवानगी घेते मी लिहायच्याआधी! जर त्यांचा उल्लेख असेल तर! :) आणि अमेरिकन माणसं पण येऊन गेली! आणि ठाणेकरांना जड जातंय! ;)

Lord Voldemort said...

मस्त लिहिलय! हलकं फुलकं छान वाटलं!
keep writing :)

Anagha said...

'Lord Voldemort'?! 'हरी पुत्तारां'चे भक्त वाटतं तुम्हीं? भारी! :)
आभार प्रतिक्रियेबद्दल! येत जा असेच!
:)