नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 14 November 2010

गीतारहस्य

ळायला लागल्यापासून बरोबर कमी आणि चुका जास्ती, हा प्रकार.
कधीकधी तीच चूक परत परत.
तर कधी रोज नवनव्या चुका. नाविन्य
सातत्याने.
"आम्ही तुला सांगतोय कारण आम्ही केलेल्या चुका तू परत करू नयेस." बाबा मला.
"आम्ही तुला सांगतोय कारण आम्ही केलेल्या चुका तू परत करू नयेस." मी लेकीला.
म्हणजे कसं चुकांची परंपरा राखणे!

शहाजीराजे शिवाजी महाराजांना..."
आम्ही तुला सांगतोय कारण आम्ही केलेल्या चुका, तुम्ही परत करू नये." शिवाजी
राजांनी मग वडीलधाऱ्यांचं ऐकलं आणि इतिहास लिहिला. म्हणजे त्यांना हे रहस्य कळून चुकलं होतं! आजूबाजूला बघितलं तर बऱ्याच जणांना हे उमजलेलं दिसतं...किंवा त्यांनी ते उमजल्याचं उत्तम सोंग तरी आणलेलं असतं!

मला नव्हतं कळलं ते गुपित. मध्येमध्ये अगदी तात्विक प्रश्न पडायचा. का बरं झाला असेल आपला जन्म?! प्रश्न फारच गहन. आणि प्रत्येकाचं उत्तर हे वेगळंच. त्यामुळे Google करून काही फायदा नाही. मग अगदी 'नाहक जन्म आपुला' असा निराशावाद देखील झाला.

पण काल उत्तर मिळालं! काय झकास उत्तर आहे!
माझा जन्म नाहक नाही
साहेब! आहे, माझ्या जन्माला कारण आहे! अखेर माझ्या जिवलग मैत्रिणीने दिलं ह्या प्रश्र्नाचं उत्तर! नकळत, पण तिनेच मदत केली! अगदी चॅनल सर्फिंग करता करता 'आस्था' लागावं आणि सर्व प्रश्नांची उत्तरे सेकंदात मिळून जावी...असंच झालं! माझी चिंता एकदम संपलीच!

सकाळी ऑफिसला
आले तर gmailच्या डब्यात वंदनाचं पत्र अलगद येऊन माझी वाट बघत बसलं होतं. पत्राचा विषय दिसत होता...Something nice I read. तिला मुळी सवयच आहे अशी. चांगलं काही वाचलं की मैत्रिणींबरोबर वाटून घ्यायचं. सुविचार घेऊन एकटीच नाही बसणार ती कधी! अगदी 'sharing is caring' च्या धर्तीवर! पत्र उघडलं. वाचू लागले. आणि काय सांगू? त्या लांबलचक पत्राची शेवटून दुसरी ओळ माझ्या आयुष्याचं रहस्य उलगडून गेली!

'It may be that your sole purpose in life is simply to serve as a warning to others.'
'
तुमच्या आयुष्याचा एकमेव उद्देशच मुळी इतरांना पूर्वसूचना देणे' हा असू शकतो.

करायला लागतं बुवाsss,
हे महान कार्य देखील करायलाच लागतं!

16 comments:

Soumitra said...

wow Anagha u remember once we talked about it finally you got an answer. Good I still remember you saying that SOUMITRA MI HE UTTAR SHODHNAR & you finally did it, Answer may be wrong or right but at least you have attempted the question , keep it up & keep writing too.

सौरभ said...

now I imagine you as an announcer (like on railway station) >>
"तुमच्या आयुष्याची गाडी भलत्या रुळावरुन धावत आहे, नको त्या स्टेशनावर जाऊन पोहचाल. सूचना संपली. धन्यवाद." :D :P

अनघा said...

hehe!!! सौरभा!! :D

Gouri said...

अनघा, अगं तीच चूक वेगवेगळ्या प्रकारांनी करून बघत असतो आपण कधी कधी ... काही नाही तर आमच्यासारखे ‘त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय’ करू नका म्हणून इतरांना सांगायला तरी उपयोग होतो ना? ;)

अनघा said...

Yes! गौरी, अगं, कित्ती मोठ्ठं काम करतोय आपण! ;)

अनघा said...

सौमित्र, धन्यवाद रे! :)

श्रीराज said...

शोध तुला लागला, पण मज्जा आमची झाली... म्हणजे अगदी 'आयत्या बिळावर नागोबा'च :)

Raindrop said...

u r being modest now...ur life is not just a warning...it is an inspiration too....about how despite all the difficulties, one can still keep ones inner core intact and be as true to oneslef as one was before the misfortunes struck. if i smiled half as much as u in half as many problems...i would be very happy with myself.

अनघा said...

वंदू, तू एकटी इतकी झगडलीयस अशक्य स्पीडब्रेकर्सबरोबर की त्यापुढे बाकी सगळे प्रॉब्लेम्स खूप क्षुल्लक आहेत ग! :)

अनघा said...

श्रीराज, :)

THE PROPHET said...

Someone has to do the dirty job! :P
चालायचंच! :D

अनघा said...

हेहे! विद्याधर! :)

हेरंब said...

चला बरं झालं.. इतके दिवस 'हे' महान कार्य करण्यासाठी पृथ्वीतलावर आमचा एकट्याचाच जन्म झालाय असं वाटत होतं आम्हाला.. चला आहे कोणीतरी बरोबर ;)

अनघा said...

हेरंब, आपला एक पंथच आहे वाटतं! म्हणजे आता आपण एकत्रितरित्या हे कार्य करू शकतो! ;)

रोहन चौधरी ... said...

माझ्यासाठी काही पूर्व सूचना आहे का??? :D

अनघा said...

:)