नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 29 October 2010

शिवणकला

शाळेमुलींसाठी शिवणाचा वर्ग असे. मग त्यावेळी मुलं काय करायची, कोण जाणे!
सुई आणि दोरा ह्यांचं एकमेकांशी नातं आणि मग त्या दोघांचं कापडाशी नातं, फारच गुंतागुंतीचं. एक चौकोनी पांढरा तुकडा चारी बाजूंनी शिवायचा. त्यावर वेगवेगळे दहा टाके घालायचे. गहू, साखळी, काश्मिरी...वगैरे वगैरे. एक तारीख दिली जायची, त्या तारखेला बाईंच्या हातात सुपूर्त करायचं. बहुतेक वेळा ते गुंतागुंतीचं नातं काही फारसं सुरेख सुटायचं नाही. ते आपलं अनुभवी आईच्या हातात जान पडायचं. मग तिच्या जाग्रणामुळे दिलेल्या तारखी, तो पिवझालेला नक्षीदार कपड़ा शिवणबाईंच्या हातात पडायचा. मग अर्थात गुण...शेरा, प्रगतिपुस्तकात विराजमान व्ह्यायचे.

पुढील कालावधीत, बहि
णींनी कापडं कापून दिली. मी हेम घातली. कापडांची झबली झाली. त्यावर रंगीबेरंगी ससे, गोगलगाई, सुरुवंट भरले...माझं बाळ साजरं दिसलं.

तर मग आता कुठे
अडलं?

शिवणकाम नीट जमत नाही. शिवलेले टाके नीट रहात नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला हेम घातलेलं खातं, अवेळी उसवतं. एकेक नाणं घरंगतं, निसटून जातं. महिनाअखेर खातं उपाशी होतं.

त्याच्या उलट, पाठीवरचंझं.
त्याची शिवण पक्की.
ना कधी उसवत. ना त्यातील दगड कधी सांडत.
दिवसागणिक दगड वाढतात.
त्यांचा पहाड़ होतो.
झ्याची शिवण? पक्की.
झं? दिवसागणिक जड.

का
त्या खात्याची शिवण कच्ची?
का ह्या ओझ्याची शिवण पक्की?

मला शिवणकला येत नाही.

17 comments:

Gouri said...

सुरेख ‘टिपलं’ आहेस! :D

माझ्या आणि शिवणकलेच्या भांडणाविषयी मागे मी थोडं खरडलं होतं.

रोहन चौधरी ... said...

महिनाअखेर खातं उपाशी होतं.... हे वैश्विक सत्य... :)

अनघा said...

रोहन, तुझ्या विश्वभर संचारातून हे सत्य अधिक तीव्रतेने जाणवलं वाटतं? ;)

अनघा said...

गौरी, थांब जाऊन वाचतेच आता तुझी शिवणकला! :)

सौरभ said...

इकडे काय मी एकटाच होतो का ज्याला आधी हा लेख समजला नव्हता??? :-S

Raindrop said...

Initially I didn't understand it but when you explained it to me I went 'OOOOOhhhhhh' and sometimes I do wonder that itke silly mistakes karanari ani itki bholi majhi maitrin,...tichya dokyala suchta tari kasa ...itni profound and geheri baatein???

but then that is the beauty of ur writing na...simple yet profound!!!

अनघा said...

:,(

अनघा said...

अमेरिकेत बसून ना असं झालंय तुझं सौरभ! ;)

श्रीराज said...

होईल होईल... इसाप थोडा अजून मोठा होऊ दे. मग थोडं ओझं तो ही घेईल :)

अनघा said...

धन्यवाद श्रीराज. तुझ्या तोंडी साखर पडो! :)

THE PROPHET said...

>>इकडे काय मी एकटाच होतो का ज्याला आधी हा लेख समजला नव्हता??? :-S
सौरभ...मित्रा...मी आहे!

अनघा said...

सौरभ आणि विद्याधर... दोन परदेश एकत्र झालेत!!! ;)
तर- बटवा ( बँकेतील खातं) दर महिन्याच्या सुरुवातीला शिवला तर तो उसवतो आणि सर्व नाणी घरंगळून जातात आणि महिना अखेरीस बटवा (खातं) रिकामा होऊन जातो.
परंतु, जे डोक्यावर ओझं आहे त्याचे टाके मात्र इतके पक्के झालेत कि त्यात दिवसागणिक रोज आयुष्यातील कठीण एक दगड येऊन पडला तरीही त्याचे टाके उसवत नाहीत...त्यामुळे त्यातील हे दगड निसटत नाहीत...आणि रोजच्यारोज ओझं वाढतच जातंय.....कणभरही कमी न होता...
म्हणून...
'का त्या खात्याची शिवण कच्ची?
का ह्या ओझ्याची शिवण पक्की?'
मला ना एकदम मोठ्ठी साहित्यिक झाल्यासारखं वाटतंय!!! ;) म्हणजे कसं एकदम अनाकलनीय लिहायचं आणि मग म्हणायचं मी माझ्या आनंदासाठी लिखाण करतो!! हेहे!! हा विनोद आहे हा! नाहीतर ह्याचं पण 'explanation मागाल!! ;)

सौरभ said...

बाबा तुपण माझ्याबरोबर आहेस... बरे वाटले... आता दोघे बेंचवर उभे राहू.
आणि अनघा मॅडम, बास का आता... कधी कधी तुमच्या गुगलीवर आमची विकेट पडते. म्हणुन काय नेक्स्ट टाईम बॅटिंग नाही द्यायची असं नाही.
(!!! हे काय होतं??? झेपलं का??? डोक्यावर टाका पडला वाट्टं) :P :D ;)

अनघा said...

hehe!! मला एकदम छडी हातात आल्यासारखं वाटतंय!!! छडी लागे छमछम, विद्या येई घमघम! (घमघम म्हणजे काय??!!) :)

संकेत आपटे said...

विद्याधर आणि सौरभच्या जोडीला मीपण आहे. म्या म्हंजी लई गद्य मानूस. असं काव्यात्म लिवलं तर कायबी शिरत न्हाई आमच्या डोसक्यात बगा. तेव्हा आता मीही बाकावर उभा राहतो. ;-)

अनघा said...

संकेत! बस आता खाली! संपला तास! ;)

Uma said...

sweet!