नमस्कार

नमस्कार

Pages

Monday, 25 October 2010

पाठिंबा

वादाचा विषय.
चार व्यक्तिमत्व. दोन प्रत्यक्ष आणि एका जोडप्याचा नुसता नामोल्लेख.
मित्र आणि मैत्रीणीमधील संवाद...

"मी काय म्हणतो, त्याने बायकोला भरपूर पाठिंबा दिला. ती आज जी आहे ती त्याच्याचमुळे असे म्हणता येईल."
"म्हणजे?"
"अगं, तुला पटत नाहीये का?"
"पाठिंबा म्हणजे?"
"म्हणजे त्याने तिला सपोर्ट केलं!"
"पाठिंबा म्हणजे सपोर्ट ते माहितेय मला."
"मग?
"पण आता पुढची पाच मिनिटे मी बोलणार आणि तू ऐकणार. आहे कबूल?"
"बोला!"
"ऐक. जरी वेदकाळात स्त्रिया शिक्षण घेत होत्या तरीही धर्माच्या नावाखाली हळूहळू त्यांचा हा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला. ब्रिटीशांच्या काळात राजा राममोहन रॉय, अॅनी बेझंट, न्यायमूर्ती रानडे ह्या सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि आपल्याला स्वतंत्र मिळाल्यानंतर कायद्यामध्ये बदल घडवून आणल्यामुळे शिक्षण घेणे हा आमचा हक्क मानण्यात आला."
"आता त्याचं काय?"
"मी तुला सांगितलं होतं, पुढची पाच मिनिटे मी बोलणार आहे आणि तू ऐकणार आहेस."
"सॉरी. बोल."
"आता, शिक्षण मिळाल्याकारणाने आम्हांला नोकऱ्या मिळाल्या, आम्ही पैसे कमवू लागलो आणि स्वतः च्या पायावर उभे राहू लागलो. बरोबर?"
"हं"
"आमची लग्नाची वये देखील आता पुढे गेली. जेवणखाण करणे, मुलांचे संगोपन करणे, घरातील लहानथोरांची जबाबदारी घेणे हे तर आम्ही आधी देखील करतच होतो. आता पैसे देखील कमवू लागलो. आजवर फक्त घरातील पुरुषमाणसे कमावत आणि बायका घर सांभाळत. आता कमावणे आणि घर सांभाळणे, दोन्ही आम्ही करतो. तर मित्रा, आता मला सांग, नवरा आपल्या बायकोला तिच्या करियरमध्ये पाठिंबा देतो असे म्हणताना, तो घरातील जबाबदारींमध्ये मदत करतो काय...हा प्रश्न उद्भवतो की नाही? घरात पैसे आणण्याची त्याची जबाबदारी तर ती खांद्याला खांदा लावून पार पाडतेय, नाही का?"
"हो"
"आता आपण ज्या दोघांबद्दल बोलत आहोत, ते दोघेही एकाच क्षेत्रात आहेत. बरोबर? तो तिला तिच्या कामात काही दिशा दाखवतो, मान्य. पण ती जेव्हा तिची व्यावसायिक जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत आहे, त्यावेळी तुझा मित्र घरगुती कामात तिला थोडी तरी मदत करतो काय? मुलाची शाळा, कॉलेजची अॅडमिशन, त्याचा अभ्यास, त्याची आजारपणे, स्वयंपाक ह्यात काही तो मदतीचा भार उचलतो काय?"
शांतता. मित्राच्या कपाळावर बारीक आठी.
"मग तू जे आपल्या संभाषणाच्या सुरुवातीस म्हणालास, त्याने तिला खूप पाठिंबा दिला, हे तू खरंच म्हणू शकतोस काय?"
"झाली का तुझी स्त्रीमुक्ती सुरु?"
"पुन्हा चुकतोयस. हा विषय स्त्रीमुक्तीचा नाही. जे पुरुष आपल्या पत्नीला पाठिंबा देण्याचा आव आणतात, त्यांच्या दांभिकतेचा आहे."
"चला, झाला चहा पिऊन. निघूया आपण. ट्रेन पकडायचीय. आठ वाजलेत. आता कदाचित गर्दी ओसरली असेल."

ह्या एक अंकी प्रवेशातील हजर पात्रे आपापल्या रस्त्याला लागली.

20 comments:

Gouri said...

१००% पटलं :)

अनघा said...

पटलं ना गं गौरी? :)

सौरभ said...

मी माझ्या बायकोला पुर्ण पाठिंबा देणाऱ्ये. तिने काम करावं. मी घरची सगळी कामं उरकेन (कपडे, भांडी, लादी, स्वयंपाक, बाजार). मी house-husband व्हायला तय्यार आहे.
(फक्त मला सकाळी उठायचा प्रचंड कंटाळा आहे. त्यामुळे सकाळच्या डब्याचा बंदोबस्त तिने करावा.)

अनघा said...

अरे सौरभ, तुझा CV झाला कि तयार! आता तू परत यायच्या आधी आपण वधू-वर सूचक मंडळांना पुरवूया का हे? म्हणजे तू परत येशील तेंव्हा तुझ्या घराबाहेर तुला मोssssssssssssssठ्ठी रांग सापडेल! :p

Raindrop said...

in todays world

pathimba det aahe = advat naahi aahe

but sometimes they do give pathimba ya...men do help out as well. todays men are way way different from what our dads used to be.

another point is...if sometimes men do try to help out at home....women are such perfectionists ke tyanna purushanni keleli kama chalatach nahi anhi swataha parat karayala zataat te. that might be a big deterrent too maybe....

अनघा said...

Vandu, I am so happy for you, that you have something like this to say here... :)

Raindrop said...

i just remembered poor partha giving his old Golf set to me and coming shopping with me to buy all the rest of the stuff. Also dropping and picking me up from practice everyday and never complaining if I tell him "there is only sandwich for lunch". somewhere te pan pathimbach aahe na....gapchup sandwich khaun ghene he :)

but ur post is quite thought provoking as it really questions fakta na adavanech aahe ka pathimba dene or there is more to it??

अनघा said...

वंदू, मला वाटतं, जेंव्हा असा क्लेम केला जातो कि एखादा नवरा बायकोला पाठिंबा देतो, तेंव्हा...मी माझ्या बायकोला कॉलेजला जायला परवानगी दिली...तिला अभ्यासात मदत केली...एव्हढ्यावरच ते थांबत नाही. इतिहास सांगतो...न्यायमूर्ती रानडे जेव्हा अभिमानाने सांगत होते कि त्यांनी त्यांच्या बायकोला...रमाबाई रानडेंना शिकवले...त्यावेळी घरातील इतर माणसे जेव्हा टोचून बोलणे किंवा इतर वाईट वागणूक त्यांना देत होती, त्यावेळी 'तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर' ह्यापलीकडे ती वाईट वागणूक थांबवली जावी ह्याकरिता त्यांच्या हातात असून देखील, त्यांनी काहीही केले नाही.
तसेच सध्याच्या स्पर्धेच्या जगात जेंव्हा बायको स्वतःच्या पायावर उभी आहे, घर चालवायला मदत करत आहे, त्यावेळी घरातील इतर जबाबदाऱ्यांमध्ये नवऱ्याचा सहभाग असणे गरजेचे ठरते. त्याला 'पाठिंबा दिला' असे म्हणता येईल. नुसते 'मी तुला ऑफिसला जाऊ देतो' ह्यावर पाठिंबा देणे संपत नाही.
आता कालच्या ह्या पोस्ट मध्ये ज्या जोडप्याचा उल्लेख आहे, त्यांच्या बाबतीत हेच आहे....त्याने तिला नोकरी करू दिली, किंवा तिच्या व्यवसायिक कामात मदत केली, ह्याचा अर्थ पाठिंबा दिला असा नाही होत. कारण बाहेरच्या स्पर्धेत टिकून रहाणे, आणि त्यात प्रगती करणे आणि त्याच वेळी मुलांचा सांभाळ करणे आणि घर चांगल्या रीतीने सांभाळणे ही तारेवरची कसरत तिला करायची असते. त्यात काही थोडी जरी गडबड झाली तर ती तिलाही नको असते आणि त्याची जबाबदारी ७५% तरी तिच्यावर टाकली जाते.
आणि ह्याचा अर्थ असा नाही होत कि चांगले नवरे नसतातच. वरच बघ ना, 'सौरभ' किती एकदम 'husband material' आहे! ;)
ही प्रतिक्रिया म्हणजे एकदम दुसरी पोस्टच झाली कि!! :)

श्रीराज said...

सौरभप्रमाणे मीसुद्धा नेहमी बायकोच्या 'पाठीशी' राहीन ;)

अनघा said...

काय रे श्रीराज, हे बोलताना डोळा का मारलायस?
:)

श्रीराज said...

Aga chukun "shift" dabaycha visarlo :)

BinaryBandya™ said...

पोस्ट वाचून आमच्यासारखे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांचे डोळे उघडतील :)
(माझे अगोदरपासुनच उघडलेले आहेत :P )

अनघा said...

मग ठीक आहे! :)

अनघा said...

बायनरी बंड्या, तळटीप दिलीस ते बरं केलंस! :)

अपर्णा said...

एकदम पटेश....आणि मुख्य इतकी सुपरवूमनगिरी करूनही श्रेय मात्र भलतीचकडे जात असत.....मी सासू होईन तेव्हातरी ही वृत्ती बदलली असेल की नाही कोण जाणे...

अनघा said...

अपर्णा, स्वागत गं तुझं ब्लॉगवर. काही नवी जोडपी बघितली कि वाटतं, बदलतेय ही मानसिकता. पण काय माहित, दुरून सगळेच डोंगर साजरे वाटतात! :)

rajiv said...

काळजात रुतले कि कोणीही पोट तिडीकीनेच बोलणार ....
मग होईना का दुसरी व तिसरी पोस्त !!!!

अनघा said...

:)

THE PROPHET said...

मला स्वतःलाच पाठिंब्याची गरज आहे! ;)
ऑन अ सिरियस नोट.. दांभिकपणा अजून शिल्लक आहेच, आणि तो दिसतो अधूनमधून...

अनघा said...

विद्याधर, पाठिंबा त्या देशात हवाय कि इथून अस्सल भारतीय हवाय? ;)