नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 10 October 2010

पिंपळपान

गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर,
एकेक पान एकटं असतं.
करंगुळीच्या नखाइतकं...
बाळपान एकटं येत.
एकटंच काय ते भरत जातं...
गुलाबी मांसल एकटंच होतं...
वेडं ते एकटंच लाजतं...
आणि वेडं, एकटंच थरथरतं.
गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर
एकेक पान एकटं असतं.

तारुण्य...एकटंच.
वार्धक्य ते एकटंच.
एकटंच कसं ते गळून पडतं.
कधी नशीब असेल तर,
कोणी एक पोर येतं...
एखादं पान उचलतं.
उचलतं ते उचलतं...
जपतं ते जपतं....
पण शेवटी एका वहीत,
त्या काळपेटीच्या...
काळोख कोठडीत,
एकटंच तर बंदिस्त असतं!
गच्च भरलेल्या हिरव्यागार पिंपळावर,
एकेक पान एकटंच असतं.

9 comments:

रोहन... said...

आज नेमके काय विचार करत झोप येत नव्हती.. ??? झोप आता.. मला तर झोप अनावर होतेय.. :)

Raindrop said...

this is a thought you had so long back....this had made my way of looking at the peepal tree different. If one paan is sad then the other can be happy. That is the detatchment every pimpalpaan has the luxury of.

Anagha said...

ya...may be Vandu...

rajiv said...

अनघा , पिंपळाला तर निसर्गानेच जन्मजात दैवी शक्ती दिली आहे कि ते कुठेही रुजू शकते व जोरात फुलू शकते ....अगदी इमारतीच्या सिमेंटच्या भिंतीवरपण !
आणि कालौघात त्याची शक्ती , नजाकत नष्ट होत नाही तर ... त्याच्या अंतरीचे सूक्ष्म घट्ट जाळे त्याच्या शक्तीची साक्ष देत बघणाऱ्याला अचंबित करत असते.

Anagha said...

विद्याधर, मौन?

THEPROPHET said...

काय बोलणार मी... :)

Shriraj said...

तरल आणि तरीही वास्तववादी!!
Very beautifully weaved.

सौरभ said...

एकटं एकटं म्हटलं तर एकेक पान एकटंच असतं.
एक एक करत एकत्र झालं तर हिरवगच्च रान असतं.

Anagha said...

सौरभ,
हिरवा गच्च पिंपळ....
हसतो...
डुलतो...
सळसळतो....
पण,
शेवटी...
पान हे एकटंच असतं...
हिरमुसून ते एकटंच गळतं!
(टाळ्या....टाळ्या...टाळ्या....!)
:)