नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday, 11 September 2010

शिस्त

त्या दिवशी दुर्गा आजी दुपारी जेवायला आल्या होत्या. आईने त्यांच्यासाठी शुध्द शाकाहारी स्वयंपाक केला होता. शयनगृहातील दुमडता येणाऱ्या जेवणाच्या टेबलावर सगळे जेवायला बसले होते. माझं जेवण लवकर आटपलं. मी समोरच्या पलंगावर बाबांच्या आणि दुर्गा आजींच्या गप्पा ऐकत बसले. बसता यायला लागल्यापासून हा माझा एक उद्योगच होता. बाबा, त्यांची मित्रमंडळी आणि त्यातील ओ की ठो न समजणारी मी. दहाव्या मिनिटाला बाबांच्या कुशीत मस्त गाढ झोप लागत असे. दुर्गा आजी मात्र अगदी आईशी, आमच्याशी सुद्धा छान गप्पा मारत असत. कधी आईने केलेल्या एखाद्या पदार्थाची पाकक्रिया वा कधी त्यांनी खाल्लेल्या एखाद्या रुचकर पदार्थाची क्रिया! तर कधी दोन दिवसांपूर्वीच होऊन गेलेल्या पौर्णिमेच्या चंद्राचे सुरेख वर्णन. विषयाला कमतरता नव्हती. त्या रंगलेल्या गप्पांत श्रवणभूमिका बजावत मी पलंगावर बस्तान मांडलं होतं. १३-१४ वय वर्ष असावं. थोड्याच वेळात बाबा काहीतरी कारणावरून माझ्यावर नाराज झालेले आहेत हे मला जाणवलं. पण मी तर काहीच बोलत नव्हते. नुसतीच तर समोर बसले होते. दुर्गा आजींचं जेवण होईस्तोवर बाबांची नाराजगी वाढली. पण मला मात्र काहीही कळले नाही.
जेवणे आटपली. आईबाबांनी मिळून केलेल्या फ्रुट सॅलेडचा आस्वाद घेऊन झाला. आणि दुर्गा आजी घरी गेल्या.

"तुला साधं कळत नाही का गं? किती वेळा मी सांगायचा प्रयत्न केला."
"पण मी काय केलं बाबा?"
"तुझं जेवण झालं. विचारून उठलीस, पलंगावर जाऊन बसलीस. इथपर्यंत ठीक होतं. पण तुला एव्हढं साधं देखील कळत नाही...तुझ्या समोर माणसं बसली आहेत आणि तू त्यांच्यासमोर पाय पसरून बसलीस? त्यांच्या जेवणाकडे, त्यांच्याकडे तुझे पाय? हा अन्नदेवतेचा आणि त्या माणसांचा अपमान नव्हे काय?"

आत्ता कुठे प्रकाश पडला. चुकलं खरं. बाबांचं ओरडणं मी माननीय दुर्गाबाई भागवतांकडे पाय करून बसले म्हणून नव्हतं. एकूणच माझं चुकलं होतं. आईची आई मी पाच वर्षांची असतानाच गेली आणि बाबांची आई बाबा लहान असतानाच गेलेली होती. घरात 'आजी' म्हणून हाक मारता येऊ शकणाऱ्या अश्या एकच. त्या बाबांना पुत्र मानत असत. म्हणून त्या आमच्या दुर्गा आजी.

दुर्गा आजींच्या नकळत, परंतु त्यांच्याशीच निगडीत अशी, माझ्या मनावर पूर्ण बिंबलेली ही एक शिस्तीची गोष्ट.

14 comments:

भानस said...

साक्षात दुर्गाआजी समोर... भाग्यवान आहेस. सासुबाईंच्या माहेरी ( केभिढवळ्यांकडे ) एकदा मी पाहिले-ऐकले होते त्यांना.

Raindrop said...

I am sure there were many many influences on you like durga aaji. If not aaji then 'A kaka', 'B Maushi', 'C Aatya', 'D bahin' etc. etc. They have filled in so much shista in you na....sometimes I feel like giving you one good shake and all ABCDEFs will fall out... one here and one there.

Or are you doing that shaking yourself and ek ek karun te dhade amchya war shower karat aahes tu??

good to read and know you better with each passing day :) keep posting!

rajiv said...

तू तर चीन मधून एकदम प्राचीन काळात नेलेस कि आम्हाला :)
दुर्गा आजींच्या आठवणी अजून वाचायला आवडतील .
तुझ्या लिखाणातून पण तुझ्यातील शिस्तीचे, नेमकेपणाचे दर्शन घडत असते ..!

Prasad said...

अनघा
तू पण काय सही लिहितेस !
मला तुझा ब्लॉग माहिती नव्हता इतके दिवस!
खूप लकी आहेस तू कि तुला दुर्गा भागवतांशी संवाद साधायला मिळाला.
काही प्रसंग मनात कायमचे कोरून राहतात ना

Raindrop said...

sorry anagha...mala kalalach nahi kon durg ji tya. atta kalala...tu sangitlya war :) i didn't know about her at all...so in case i wrote something i shouldn't i do apologise.

अनघा said...

वंदू, काकांना फोन लाव पाहू! आणि विचार दुर्गा भागवत कोण होत्या? मस्त एक हुबळीहून दिल्लीला तुला डोक्यात टपली मिळेल!! :)

Raindrop said...

aga kela ga me tyanna google...read about her. this year is her centenary. hublivarun ka tapli milel mala....tu aahes na half way Mumbai la....maarayala zordar tapli!

अनघा said...

प्रसाद, तुझे स्वागत असो! :)

सौरभ said...

मला दुर्गा भागवतांबद्दल माहित नाही. अत्ताच विकि केलं तेव्हा समजलं. बाकी हम्म्म... आम्हीपण ह्या शिस्तीचे पुरस्कर्ते आहोत... :) (वाह... कसलं भारी वाट्टं पुरस्कर्ते आहोत म्हणायला. Award मिळाल्यासारखं वाट्टं.)

अनघा said...

सौरभ, पुरस्कर्ते की भोक्ते?

अनघा said...

अगं, भाग्यश्री, झाल्या का बॅगा भरून?

भानस said...

त्या भरून होतील गं तश्या दोन दिवसात पण घराची निरवानिरव करायला हवीच नं... नाहितर मी परत येईन तेव्हां, धुंडो धुंडो रे साजना... आय मीन वस्तुनां... अशी व्हायची.

रोहन चौधरी ... said...

शिस्त म्हणजे शिस्त... :) अनेक बारीक आठवणी असतात ज्या अश्या ना तश्या लक्षात राहिलेल्या असतात.

अनघा said...

मला वाटतं रोहन, आपल्या सगळ्यांच्याच घरी शिस्तीच्या नावाखाली सारख्याच गोष्टी असायच्या. नाही का? :)