नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 28 September 2010

प्राजक्ती स्वप्न

झाले काही दिवस.....
मी माझी स्वप्नं खुडायला घेतली.
एका दिवशी एक स्वप्न.
एकेक खुडावे....
कचराकुंडीत टाकावे.
पण काल गंमत झाली...
पहाटे पहाटे जाग आली.
आसमंत भरलेला...
घमघमाट सुटलेला...
अंगणातील कचराकुंडी....
झाडाने बहरली...
तेव्हढ्यात एक झुळूक आली....
फांदी न फांदी नाचली...
तिच्या अंगावर काटा आला...
सुळकन खाली सडा पडला.
लालबुंद माती...
पांढरी झाली.

माझ्याच स्वप्नांची तर ती फुलं होती...
उजाडताच सगळी मातीमोल झाली!

14 comments:

श्रीराज said...

असे स्वप्न जो पर्यंत प्रत्येक भारतीयाला पडत नाही तो पर्यंत आपले स्वप्न स्वप्नच राहणार आहे

अनघा said...

:(

rajiv said...

`स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा ...' , असे म्हणूनच लिहुन ठेवले असावे.

पण त्या एकदा उमलल्या ... कि मग त्यांना गळून पडावेच लागते ..हा निसर्गनियम !

अनघा said...

पण उमलायच्या आधीच?

rajiv said...

त्यांना उमलायचेच असेल तर ` सत्यात', स्वप्नात नाही ..... !

THE PROPHET said...

...

अनघा said...

hmmmm...आजचा दिवस थोडा घसरलाय!

अनघा said...

माझ्या एका मित्राची ही प्रतिक्रिया! दिवसाच्या शेवटी हसवून गेली! "आयला तुम्ही artist /कलाकार लोक म्हणजे की देवाने मिश्रण बनवलंय न त्याला सुद्धा ठाऊक नसेल तर मला कुठले कळतंय ??? anyway when train derails we always take help of disaster management, just locate right disaster management people & u will be back on track ! Regards"
:)

Soumitra said...

आयुष्यात कधीच कुटचीही गोष्ट सजीव किवा निर्जीव हि मातीमोल होत नसते, नेहमीच फुलाचा सुगंध आयुष्भर दरवळत राहतो अगदी आपल्या लोकांचा अठ्वानिसारखा त्या मुळे आपण नेहमीच आठवणीबरोबर आनंदाने मजेत राहीचे असते.

अनघा said...

hmmmmm
:)

सौरभ said...

flip the coin...

स्वप्न झाली मातीमोल, की मातीतही स्वप्न रुजली?
दुसरे दिवशी पहाता, त्या मातीतच पालवी फुटली...
हिरवे कोंब बहारले, अगणित फुलांनी तरु डवरला
गंधहिन मातीनेच एक सुगंधी पुत्र उजवला...

the Dark End is the Begin of a Bright Start...

अनघा said...

सौरभ, That's nice! फक्त आशा आहे कि शोलेतील अमिताभ बच्चनच्या नाण्यासारखे माझे नाणे नाही! :)

सौरभ said...

u can've my coin :)
it has smiley face on both the sides ;) :P

अनघा said...

सौरभ! धन्यवाद! :)