नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday, 5 September 2010

तुझ्याविना...

शाळा संध्याकाळी सुटायची. शाळेच्या बसने घरी आलं, बॅग टाकली की खाली खेळायला धावलं. मग कोणाकोणाची हजेरी लागलीय ते बघावं आणि ज्या सख्या आल्या नसतील त्यांच्या नावाने इमारतीखाली उभं राहून हाळी द्यावी. एक नाही, दोन नाही, अगदी श्वास लागेपर्यंत. (हाळी हा फारच पुस्तकी शब्द झाला. जे काही आम्ही करायचो त्याला बोंबाबोंब हाच शब्द खरं तर योग्य होईल. म्हणजे तुम्हा वाचकांसमोर बरोब्बर चित्र उभे राहील. तुमच्या कानावर ती बोंबही पडेल कदाचित. वेगवेगळ्या काकांकडून आणि वेगवेगळ्या मावश्यांकडून, त्यांचे कान किटवण्यावरून खूप ओरडादेखील खाल्ला. परंतु सुधारणेला जागा नव्हतीच कधी!) तर एव्हढ्या हाका मारून देखील कोणी दाद लागू दिली नाही तर मग दाणदाण आवाज करत जिना चढावं, घंटा वाजवावी आणि घरात प्रवेश मिळवावा. ("अगं, मुलगी ना तू? काय हे तुझं लक्षण?" ओरडल्या खाष्ट काकू! आता मुलगी आणि दाणदाण जिना चढणं, ह्याचा काय संबंध?) मग सखीची तयारी होईस्तोवर मावशींशी गप्पा, तिच्या धाकट्या भावंडांशी थट्टामस्करी आणि त्यावर मावशींनी नुकतीच केलेली गुळपापडीची गरमागरम वडी तळहातावर ठेवली तर अजूनच मजा! मग एकमेकींचे हात घट्ट धरून खाली धाव घ्यावी. सूर्य मावळेस्तोवर धुमाकूळ. सातच्या आत मात्र घरात!

हे आठवायचं कारण? मोबाईल मेला आणि जगाशी संबंध फक्त हे जाळं, घरचा आणि कार्यालयातील टेबलावरचा फोन ह्यावर मर्यादित राहिला. शनिवार-रविवार तर ऑफिसदेखील नाही. ह्या धोक्याची जाणीव शुक्रवारी संध्याकाळी, ऑफिसमधील माझ्या सर्विसिंगच्या कंपूला झाली होती आणि घरच्या फोन क्रमांकाची जोरदार मागणीही झाली. परंतु, "काय माझं डोकं फिरलंय?" असा त्रिवार निषेध जाहीर करून मागणी फेटाळल्याने हक्काची सुट्टी शांततेत गेली.

आज संध्याकाळी मैत्रिणीबरोबर भटकायला बाहेर पडायचे ठरवले. तिच्या घराखाली गाडी लावली आणि लक्षात आले. आज आपल्याकडे मोबाईल नाही. वरती संपर्क कसा साधणार? आणि जर तिला मी खाली आले आहे हे वरती कळलेच नाही तर सखी खाली कशी येणार? तिच्या इमारतीला, तळमजल्यावरून बोंब मारायची काही सोयही ठेवलेली नाही! मग तिच्या पाचव्या मजल्यावर जाऊन घंटा वाजवली आणि तिने हसतमुखाने दार उघडल्यावर हे सगळे मागचे हरवून गेलेले प्रसंग नजरेसमोर आले. गंमत वाटली. तो अनुभव जागा झाला. मग काकाकाकींशी मनसोक्त गप्पा, सोबत झकास कॉफी आणि मग घर सोडणे.

आजचा मला वाटतं चवथा दिवस. पूर्वी परदेशात घेतलेला एक जुना फोन दुरुस्तीच्या कारणास्तव त्याच्या मायदेशी परत पाठवला होता. तो मुंबईत शुक्रवारीच दाखल झालेला आहे. तब्येतपाणी सगळे एकदम ठीकठाक आहे अशी बातमी कानी आली आहे. परंतु ज्यांच्या बॅगेतून आगमन झाले आहे त्यांचा मुंबईतील दूरध्वनी क्रमांक माझ्या माहितीत नसल्याने (किंवा असला तरी देखील तो त्या मृत फोनच्या पुस्तकातच असण्याची शक्यता असल्याकारणाने) आता ते मित्रवर्य जेंव्हा फोन करतील तेंव्हाच त्या परदेशी फोनची घरी परतण्याची संभावना आहे! आणि तो, म्हणजे 'तो फोन' परतण्याची शक्यता असताना घाईघाईत दुसऱ्याला आणून उभं करणे म्हणजे प्रतारणाच झाली की हो! वाट बघण्यापलीकडे आता हातात काही नाही!

धीर धरी...धीरापोटी फळे गोमटी!

10 comments:

भानस said...

एका फोनपायी किती रामायण... :D. बाकी ’बोंबाबोंब ’ करताना अगदी मस्त वाटायचं... मोकळं मोकळं... आजकाल सगळंच कोंडलेलं...

Raindrop said...

you two had coffee without me?????? me pam aale aste na :( ek zorr se awaaz lagayi hoti na...beyond that 5 th floor...yahaan dilli tak sunai denewali! main jhat se aa jaati :)

सौरभ said...

साला एक फोन आदमीको कितना बेबस कर देता है ह्हाय (अमिताभ स्टाईल)
आणि खालून हाक मारायची लयभारी गंमत असते. मी चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या मित्राला हाकायचो तेव्हा त्याच्या आधी खालच्या तिन मजल्यांवरचे बाहेर येऊन बघायचे कोण कोकलतोय ते. :D
ooOOooOOOOooOOOOO (आता हे टारझन स्टाईल)

अनघा said...

सौरभ, तुझ्यामुळे ना मला स्थळ आणि काळ ह्याचे भान न ठेवता खो खो हसत सुटायची एक खोड लागलेली आहे!! :D

अनघा said...

वन्दूsssssssssssssssssssssssssssssssssss! हल्ली ना, आम्ही तुझ्या नावाने कितीही बोंबाबोंब केली ना तरीही नवऱ्याच्या कुशीत तुला काही ऐकूच येत नाही!! :( दुष्ट!! ;)

अनघा said...

हो ना! भाग्यश्री, हल्ली सगळे हळूच एसएमएस चे उद्योग!! :)

श्रीराज said...

मोबाइल् मूळे त्रासही होतो...खरं तर तापच जास्तं, पण तो नसेल तर गैरसोयही तितकीच..हो ना?

अनघा said...

hmmmmmmm. जाऊन घेतला मी शेवटी एक साधा फोन! सगळ्यांनाच त्रास न माझ्या हट्टीपणामुळे! म्हणून!! :(
:)

रोहन चौधरी ... said...

नशीब घेतला तो फोन... नाहीतर.... :)

अनघा said...

I know!!! arey, naahitr ugaach pudhachyaa aanakhin 10 post mi hech gholat basale asate!!! Ho naa?? :D