नमस्कार

नमस्कार

Pages

Friday 24 September 2010

हम नही सुधरेंगे!

"कधी शिकणार तू तुझ्या चुकांपासून?"
"मागच्यावेळचा अनुभव विसरलीस वाटतं? "
"This is the second time you are making this mistake!"

किती वेळा ऐकलंय हे? वडिलधाऱ्यांकडून? वरिष्ठांकडून?
आणि आपण किती वेळा हे दुसऱ्यांना ऐकवलंय?

पण आता आपलं हे असं का होतं त्याचं उत्तर मिळालंय! अमेरिकेत! मॅसाच्युसिटस (मला आशा आहे की ह्या क्लिष्ट शब्दाचा उच्चार बरोबर लिहिला गेला आहे!) मधील एका संस्थेत. त्यांनी मेंदूवरील केलेल्या शोधामध्ये त्यांना सापडलंय की आपला मेंदू आपले यशच फक्त लक्षात ठेवतो. चुका नाही. अपयश मेंदूमध्ये खूप कमी प्रमाणात किंवा बऱ्याचदा शून्य बदल घडवून आणतं. मात्र यश मेंदूत चांगलेच बदल घडवतं!

म्हणतात ना उगाच वाईट लक्षात ठेऊ नये! आणि आता जर आपला मेंदू लक्षातच ठेवत नाहीये...तोच मुळी स्वतःत बदल घडवून आणायला तयार नाहीये तर मग आपण कसे काय आपल्या चुकांमधून शिकणार? थोडक्यात काय, तर मग आपण कसे बदलणार?

नाही का?
काय वाटतं तुम्हांला?
(अर्थात एकूणच जगभर लोकं फारच अभ्यास करतात. किंवा साध्या साध्या गोष्टींचा फारच कीस काढतात, ही बाब अलाहिदा!)
:)

12 comments:

Raindrop said...

finally a scientific approach to story of my life!!!!

Shriraj said...

खरंच... मी ही त्याच त्याच चुका करत राहतो

Anagha said...

वंदू, बरं झालं ना? उगाच आपण टेंशन घेत होतो! ;)

Anagha said...

श्रीराज, अरे आपलं काsssssssssही चुकत नाही परत परत चुका करण्यात! :)

THEPROPHET said...

>>एकूणच जगभर लोकं फारच अभ्यास करतात. किंवा साध्या साध्या गोष्टींचा फारच कीस काढतात,

हे खरं! :P
बाकी सगळं मला कळलं नाही, म्हणून मेंदू विसरून गेला! :D

Anagha said...

विद्याधर,(The prophet हे मोठ्ठं नाव प्रत्येक वेळी न लिहिण्याचे आता स्वातंत्र्य घेतलंय. आशा आहे की आक्षेप नसावा.) 'अचूक' असता का तुम्ही नेहेमी? :D

THEPROPHET said...

अनघा,
तुम्ही मला 'अरे विद्याधर' असं म्हटलंत तर मला आवडेल! :)
बाकी मी बापुडा कसला अचूक... तुम्हीच सांगितलंय..
>>आता जर आपला मेंदू लक्षातच ठेवत नाहीये...तोच मुळी स्वतःत बदल घडवून आणायला तयार नाहीये तर मग आपण कसे काय आपल्या चुकांमधून शिकणार?
माझा मेंदू अचूकपणे चुका विसरून जातो! :D

सौरभ said...

आपण रजनिदेवाजींचे भक्त, म्हणुन आपण कधी गलत असुच शकत नाय.
विद्याधर मिथुनी असल्याने त्याच्याबाबतीतपण चुक असण्याची शक्यता नायच नाय.
बाकी दुनियेला हे पटत नाय... त्याला काय करणार!!!

पैकीच्या पैकी मार्क >> एकूणच जगभर लोकं फारच अभ्यास करतात. किंवा साध्या साध्या गोष्टींचा फारच कीस काढतात.

Anagha said...

सौरभ, ही तुझी राजनिदेवभक्ती एकूणच झकास दिसतेय! ती केल्यावर काही बरेच लाभ होतात हे कळलंच आहे मला! तेव्हा आता ह्या देवाच्या दारी जावयाचा मार्ग सांगावा गुरू! :)

Anagha said...

विद्याधर, हा शास्त्रीय आधार मिळाला ते एक बरंच झालं न्हवं?! :)

Unknown said...

अनघा, म्हणूनच म्हणतात का ग 'यश डोक्यात जातं?! :)

Anagha said...

अगं अभया, तू प्रतिक्रिया लिहिलीस ह्याचाच मला खूप आनंद झालाय! स्वागत स्वागत स्वागत! :)