नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday 23 September 2010

मी काय करीन?

काल एक पुस्तक वाचून संपवलं.
'Paulo Coelho चं 'Veronika decides to die'.
माणसे कायम आपल्याला कधीतरी कोणीतरी दिलेला 'आयुष्यमान भव' हा आशीर्वाद अगदी खराच होणार आहे ह्या भ्रमात दिवस काढत असतात. परंतु समजा मला कळलं की मी फक्त पुढचा एकच आठवडा जगणार आहे...तर काय मी अशीच जगेन?

एकदोन वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने हा असा प्रश्न मला घातला होता...फक्त त्याने मला जगण्यासाठी अगदी एकच आठवडा नाही तर एक महिना दिला होता. "जर तुला सांगितलं की तू एकच महिना जगणार आहेस, तर काय तू आज जे करत आहेस तेच करशील? की तुला ह्या पठडीतून बाहेर यावंसं वाटेल आणि काही वेगळं जगावसं वाटेल?" मी अगदी मला जितका झेपेल तितका खोल विचार केला. "नाही रे, मी हेच करेन बहुधा. सकाळी उठेन. लेकीचा डबा तयार करेन. तिला उठवेन आणि तिला टाटा बाय बाय अगदी ओरडून करेन. आणि नीट जा ग. आणि लवकर घरी ये, हेच बोलेन."
"फुकट आहे तुझं आयुष्य!"

माझं आयुष्य फक्त चाळीस वर्षांचं आहे असं सतत म्हणणारी आणि आपल्या शब्दाला जागून चाळीस नाही तरी पन्नास वर्ष पूर्ण करून निरोप घेणारी माणसे देखील बघितली. पण मग ती मिळालेली पन्नास वर्ष विचारपूर्वक वापरली गेली का हे ज्याचं त्यालाच माहित.

कित्येक सैनिक जीवाची तमा न बाळगता माझ्या देशाचं रक्षण करतात. त्यांना कोणी सांगितलं,"आता फक्त पुढचा एकच आठवडा"....तर?
रोज लाखो रुपये खाऊन आमचे पुढारी सात पिढ्या खातील असे वैभव उभे करतात....त्यांना विचारलं..."आता फक्त पुढचा एकच आठवडा"....तर?
तिथे जगातील अतिश्रीमंत यादीत नाव असलेला बिल गेट जाहीर करतो की त्याने जमवलेले वैभव तो आपल्या वारसांसाठी सोडून नाही जाऊ इच्छित...तेव्हा तो स्वतःला हेच रोज बजावीत असतो काय?...पुढचा फक्त एकच आठवडा.

प्रत्येक क्षण हा पुढच्या क्षणाला इतिहासात जमा होतो.
जर ह्यापुढे प्रत्येकाला त्याचे आयुष्य किती आहे ह्या आकड्याची जाणीव फक्त 'त्याला' करून दिली तर काही फरक पडेल?

"चल, दिले तुला सात दिवस.
बघू काय दिवे लावतोस.
माझा गळ तयार आहे.
टाकायला सात दिवसांचा अवधी आहे."

माश्याला नाही का पाण्यात पडलेला गळ तर दिसतो.
मग काय तो सर्वांचा निरोप घेतो?
इतिहासात जमा होता होता...
काय तो मनाशी विचार करतो?
मी मेलो तरी चालेल...
निदान मी कोणाचं पोट तरी भरेन!

"अरे चल यमराजा,
वाजवलीस ना वॉर्निग बेल?
आजपर्यंत आत्मा होता...
पण आता शरीर अमर करीन!
आयुष्यात दुसरं काही नाही केलं...
...पण देहदान मी नक्कीच करीन!"

14 comments:

Shriraj said...

अनघा, आजचा धडाही जबरदस्त! खरंच!!

Anagha said...

श्रीराज!! बालभारती छापते वाटतं मी रोज????
:)

THEPROPHET said...

>>आजचा धडाही जबरदस्त!
+१ :P
मी काय करेन आठवड्याभरात...??
छ्या...एका आठवड्यात होण्याजोगं काहीच नाहीये!
(मुन्नाभाई मध्ये झहीर म्हणतो ना... आधे दिन की जिंदगी दी है मुझे! तसं :) )

Raindrop said...

i also feel 'i would have lived like this only'....one day in Hawaii...one day in delhi....one day in Raipur...one day in Hubli...one day in orissa ...and one day in Mumbai :)

aur baki bacha ek din....wo to pray karne ke liye...ke bhawaan....mujhe ek week aur de do :)

Shriraj said...

मी 'त्या' आठवड्यात सर्वात आधी तुमच्या सर्वांची प्रत्यक्ष भेट घेईन :)

Anagha said...

Right! श्रीराज, मी पण हे नक्कीच करेन! :)

Anagha said...

वंदू, अजून 'हवाई'ची उतरली नाहीये ना?? Good good ! नकोच उतरू दे! :)

rajiv said...

हा विचार करायला लावणे हेच एक भन्नाट कर्तुत्व आहे तुझे......!


ज्या क्षणी ` ते सात दिवस ' मिळाले, त्या क्षणी आजपर्यंत जेथे व ज्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो , तेथून गायब होऊन , देशाटनाला जाऊन जेथे `तो' भेटेल तेथे त्याचे स्वागत करीन ......! ( मार्गात जसे जमेल तसे भले -बुरे वेचत -वाटत जाईन ...) , ते गायब होणे म्हणेजे लौकिक अर्थाने मृत्यूच कि...

Anagha said...

राजीव, हे कर्तुत्त्व माझे नाहीये! Paulo Coelho चे आहे! :)

Anagha said...

The Prophet, म्हणून तर मी माझी जबाबदारी स्वतःवर न घेता ती वारसांवर टाकलीय! :)

rajiv said...

असेल , पण आम्हाला आपणच `पावला'त न ?

Anagha said...

वाईट होता हं राजीव! :D

सौरभ said...

एक आळशी व्यक्ती:
उभं आयुष्य काही केलं नाही, आता कशाला नसते उपद्व्याप? आराम करा...

एक रजनिभक्त:
रजनिदेवाचा धावा करा. सात दिवसांची मुदत ७० वर्षासाठी वाढवुन मिळेल.

An INCEPTED person:
सरळ झोपुन जाईल. मग स्वप्नात स्वप्न, पुन्हा त्यात स्वप्न, त्यात स्वप्न, पुन्हा स्वप्न... स्वप्न, स्वप्न, स्वप्न... दिवसांची वर्ष, वर्षांची शतकं, शतकांची युगं... यमदुताच्या कितीतरी पिढ्या जन्मतील तोवर.

पण आपण नेहमीसारखी life Njoy करणार बावा... येsss नाच्च्योsss... जल्दीही नया जनम मिलनेवाला है, तब जो करना है करेंगे...
या तबतक ढिंच्यॅकढिच्यॅक ढिंच्यॅकढिच्यॅक... पाsssर्टी...

Anagha said...

सौऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊउरभ!!!
:D :D :D