नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 11 September 2010

पत्ते

लहानपणी पत्ते खूप खेळलो. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकामागोमाग एक डाव रंगत जायचे.
भान ना वेळेचे. भान ना भुकेचे.
गाढवपिशी, गणिती झब्बू, not -at -home, बदाम सात, मेंढी कोट, सात-आठ, पाच तीन दोन, ३०४, कनाष्टा...
त्या खेळांत एक 'जोड्या जुळवा' असा देखील खेळ होता.
ज्याच्या जोड्या लवकर जुळतील तो लवकर सुटेल.
आणि ज्याला हे जोड्या जुळवण्याचे प्रकरण नाही जमणार...तो डाव हरेल.
आज प्रकर्षाने त्या खेळाची आठवण झाली.
जोड्या...
आईत मैत्रीण शोधू नये.
नवऱ्यात मित्र शोधू नये.
मित्रात प्रियकर शोधू नये.
लेकात मित्र शोधू नये.
लेकीत मैत्रीण शोधू नये.
खरं तर मैत्रीच शोधू नये.
उगाच रानोमाळ फिरू नये.
जोड्या चुकतात.
डाव हरतो.
हरलेल्या प्रत्येक डावाबरोबर आत्मविश्वास हरतो.

बाबा बरोबर सांगत होते...
चांगल्या घरच्या मुलींनी पत्तेच खेळू नयेत.

16 comments:

भानस said...

अनघे, अगं ओढीने भेटायला यायला निघालेय तर तू आधीच मला घाबरवतेस होय...

Raindrop said...

Ohh...you sometimes leave everyone speechless. This is me speechless ....................................................................................................................................................

सौरभ said...

लौsssली... u kno not-at-home??? बऱ्याच जणांना माहित नाही हा खेळ. आणि कनाष्टा (कॅनेस्ट्रॉ??? ज्यात लाल तिर्रीला १०० पॉईंट असतात?) अरे हा भिकार-सावकार राहिला.

Anagha said...

सौऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊरभ!!!!! :D :D :D

सौरभ said...

=)) हि वरची हाळी हिमेश रेशमिया स्टाईलची होती एकदम... हाहाहा :D

BinaryBandya™ said...

jokerla kuthalihi jodi chalate nahi ka ??

navara aani mitra ashi 2-2 nati nibhavatana ekhadyacha jokerch hot asel ??

Raindrop said...

ha ha so totally agree with binary. and thanks to saurabh this 'serious' topic has taken such a pleasant funny turn :) sach anagha am so happy you found friends who can make you smile even in adverse conditions. that's what friends are for. this blog and your genuine writing have got you 'moti jaise people'.

even if the post is about sadness at time....just the comments and being surrounded by such positive people is a good enough reason to keep coming back to your blog :)

nag zama kele aahes tu :)

Anagha said...

वंदू हे मात्र खरंच आहे. कधीकधी असं वाटतं कि आपण सगळे एकत्र जमलोय आणि मस्त गप्पा रंगल्यात. आणि रडगाण्याने एकदम धूम ठोकली आहे! खिडकी बाहेर!! :D :D

Anagha said...

'nag zama kele aahes tu '. अगं वंदू, हे तुझं वाक्य मी पहिल्यांदा वाचलं आणि मला कळेच ना कि मी नाग कुठून जमा केले!! मला एकदम मी 'मेडूसा' झाल्यासारखी वाटले!!! डोक्यावर सगळे नाग! मग लक्षात आलं कि मॅडमना 'नग' म्हणायचंय! अगं भटीण, 'नग' हा काही फारसा 'पॉझीटिव' शब्द नाही! छान मित्रमैत्रीण जमवलेत मी! एक बरं आहे, तुझं मराठी जरा सुधारत चाललंय! :D

Raindrop said...

nag=precious stone...that is how I understood it. it could be a collection of diamonds, rubies, emeralds. not positive???

medusa karayacha asta tula tar me 'naag' mhanale aste na! forgive ya...it might be my mother tongue but it is not my first language...prayatna karatach aste na me marathit bolayacha...use to marks de...rajach hot chalala aahe tuzha haan ;) he is my fav. though ;)

Anagha said...

बायनरी बंड्या, तुम्हांला नाही का बायकोमध्ये नेहेमीच मैत्रीण हवी असते. आणि मग जन्मभर तिला ती तारेवरची कसरत करावी लागते? :)

Anagha said...

तसं नाही गं भाग्यश्री! वाट बघतेय मी उलट तुझी!! :)

रोहन... said...

मला पत्ते फारसे आवडत नाहीत. मोजके आवडीचे खेळ आहेत मात्र... :)

Anagha said...

रोहन, गाढवपिशी वाटतं? ;)

संकेत आपटे said...

वाह! क्या बात है! अहो, कधीतरी विनोदीपण लिहा की. प्रतिक्रिया द्यायला सोपं होईल. माझ्यासारख्या कमी बुद्ध्यांक असलेल्या माणसाला विचार करायचा म्हणजे मोठं संकट. त्यामुळे विनोदी लवकर शिरतं डोक्यात. :-)

Anagha said...

:) संकेतबुवा, ठरवून विनोद करता येतो का? :)