नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 7 September 2010

माणुसकी...

माणुसकी.
एक हरवलेली 'की'.
आत्ता आत्ता होती.
कशी निसटली?
कधी हरवली?
खोल दरीत जाऊन पडली.
खोल दरी,
खोल समुद्र.
बघता बघता झाली दिसेनाशी.

कोण करेल आता समुद्रमंथन,
शोधून काढेल ती...

माणुसकी.
एक हरवलेली 'की'.

12 comments:

Raindrop said...

I relate to it with my yesterdays episode :( and I feel maybe I also added to the kicks that sent manuski rolling into the deep deep sea.

Anagha said...

arey! Vandu!!

Deepak said...

अगदी खरं ! माणुसकी इतक्या खोल समुद्रात हरवली आहे कि समुद्रमंथना शिवाय पर्यय नाही...

भानस said...

सार्वत्रिक मंथनाची नितांत गरज. कदाचित सुरवात स्वत:पासूनच...

juikalelkar said...

नाही ग थोड़ी तरी शिल्लक आहे म्हणून तर तू अन मी आहोत

HAREKRISHNAJI said...

क्या बात है

सौरभ said...

मी असाच किनारी फिरत होतो. एक मोठा जथ्था समुद्रात आत जाऊन समुद्र घुसळताना दिसला. मी खुप हातवारे केले. क़ोणीच लक्ष दिलं नाही. माझ्या हातातल्या 'की'ल्ल्यांचा आवाजपण ऐकू गेला नाही. चला... जाऊदेत... घुसळूदेत... अरेच्च्या... ती बघा अजुन एक 'की'ल्ली... किनाऱ्यावरच पडलीये... हि लोकं समुद्रात काय शोधतायत काय माहित?!!

Anagha said...

:)
बरोबर जागी शोधा म्हणजे सापडेल...नाही का सौरभ? मला आशा आहे कि ती हरवलेली माणुसकी लवकर गवसेल.
बाबा,"माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. मग देवासमोर रांगा लावायची गरज नाही उरत."
:)

Anagha said...

हे बरिक तुझं बरोब्बर आहे हं भाग्यश्री!!

Anagha said...

हरेकृष्णजी, तुम्ही भेट दिलीत...आनंद झाला. :)

संकेत आपटे said...

छान, सुंदर, मस्त :-)

Anagha said...

आभार संकेत! :)