नमस्कार

नमस्कार

Pages

Sunday 5 September 2010

जाब

सगळ्याचा हिशोब....
मांडावा लागतो.
सगळ्यालाच उत्तर.
द्यावं लागतं.
एकदा एक मैत्रीण जेवायला आली. मी पावभाजी केली. तिने मला पद्धत विचारली.
टोमॅटो, बटाटा...मी सुरुवात केली.
"नाही! आलं किती इंची..लसणाच्या पाकळ्या किती...मोजमाप सांग."
आली का पंचाईत? मोजमाप तर मला येतंच नाही.
समोर काय वाढून ठेवलंय ते बघावं आणि गोडतिखटाचं माप ठरवावं.

आता ह्यांना प्रश्न पडतो.
"रडत का नाहीस?"
"बोलत का नाहीस?"
"You are very optimistic!"

मला तर काही कळत नाही.
असं काही मी ठरवलं नाही.
असा हिशोब मला मांडताच येत नाही.
असं मोजमाप मला करताच येत नाही.

त्याला तरी जमलंय का हे गणित?
किती इंची दुःख?
किती पाकळ्या सुख?
सगळीच तर ह्याची भेसळ!
थोडं चुकलेलं. थोडं बरोबर.
कोणाचंच नशीब 'परफेक्ट' नाही.
कोणाचंच साफ चुकलेलं नाही!
सगळाच ह्याचा 'जेमतेम' कारभार.

म्हणतेस,"अशी न बोलता राहू कशी शकतेस? सांग मला कोणाशी बोलतेस?"

म्हणतात, "माणसाने स्वतःशी मैत्री करावी. म्हणजे मग कोणाची गरज लागत नाही!"

लहानपणी फुटक्या बांगड्यांचा खेळ आम्ही खेळायचो.
रंगीबेरंगी तुकडे फेकावे...आणि मग एक एक करून वेचावे.
वेचताना दुसऱ्याला कणभरही धक्का पोचता कामा नये.
खेळाचा दुष्ट नियम.

तोच तर खेळ चाललाय माझा...
बेरंगी काचा तुझ्या आयुष्यातून वेचायचा...
त्यांचा स्पर्श तुला होऊ न देण्याचा.

11 comments:

vaibhav_sadakal said...

हो माणसाने प्रथम स्वत:शी मैत्री केलीच पाहिजे.बरोबरच आहे तुमचं.........

Raindrop said...

i learnt a lovely phrase...maybe from you or some other friend. swaypak kartana mapun mozun ingredients takle tar that is being true to the recipe. But if you love the people you are serving and cook with love then all u can think of is that person sitting in front and enjoying this meal.then only one maap works....'manacha maap'.

And manacha maap has no hishob. No questions to answer. No answers to be diplomatic. It is a maap that is individual and you alone know what is best maap for the recipe of ur life.

Tuch sangitla hotas mala asa vatatay.

भानस said...

सुखामागे दु:ख आणि दु:खामागे सुख हा अव्याहत चालणारा नियतीचा आवडता खेळ आहे. अपवाद आहेत पण संख्या नगण्यच. असा तराजू जेमतेमच असतो आणि किंबहुना तेच योग्यही असणार.

अनघा, बरेच प्रश्न मांडलेस आणि उत्तर देता देता हलकेच विचारांच्या भोवर्‍यात सोडलेस. प्रत्येकाचा भोवरा गरगरेल त्याच्या त्याच्या गतीने व हिशोबाने.

सहीच!

सौरभ said...

गेम बदलो भाय. नायतर गेम के रुल बदलो. आणि मापाचा हिशोब ठेवलेला बरा असतो. शिंप्याने बिनमापाचे कपडे शिवले तर चालेल काय?? ;) :P मग?? बाकी माप ठरवावं, काढू नयेत.. :D
आणि पावभाजी कशी झालेली??? मीपण बनवलेली इकडे... एकदम सॉल्लिड... आता पावभाजी बनवण्यात मी कोणालापण टक्कर देऊ शकतो. :)

Anagha said...

हो! आठवली! मला तुझी पावभाजीची पोस्ट आठवली!! मस्त झाली होती ना?! हम ने ये बहोत बार दोस्तों से सुना ही के हम जो भी बनते ही सहीच बनता है!! ( सौरभ, हे तुझ्या इस्टाइल मध्ये!!) :D

सौरभ said...

आयला... झक्कास्स्स (रंगिलाच्या अमिर खान स्टायलीत)
और हमने दुश्मनोसेभी सुना है, हम जब उन्हे "बनाते" है तोभी सहीच "बनाते" है :P :D ख्यॅख्यॅख्यॅ

BinaryBandya™ said...

बेरंगी काचा दुसर्याच्या आयुष्यातून अलगद त्याच्या नकळत वेचायच्या ..
अप्रतिम ....

रोहन... said...

तुझ्या एक एक पोस्टबरोबर तुझा मोठा पंखा होत चाललो आहे... ४ पात्या असणारा.. गरागरा फिरणारा... :D हे हे.. शेवट अप्रतिम..

Anagha said...

अरे! गरागरा फिरत राहून वाचणार कसा तू मग?? :(
काय हो रोहन बुवा?
:)

Anagha said...

वाईट मारला ना मी एकदम रोहन!! :)

Anagha said...

भाग्यश्री, मला ना हे असेच सारखे सगळे प्रश्न भेडसावत असतात! :)