नमस्कार

नमस्कार

Pages

Friday, 20 August 2010

चला मंडळी...

तयार होऊन बसलेय. घड्याळ पुढे सरकण्याची वाट बघत. travel light ...हे तत्व आता इतक्या प्रवासानंतर अंगात मुरलंय. एक मोठी बॅग आणि एक छोटी पर्स. इतुकेच माझे ओझे! शेवटच्या क्षणापर्यंत मान मोडून काम करवून नाही घेतलं तर मग कसली ही advertising agency! 'Deadlines ' पाळणे जास्ती महत्वाचे!
जाऊ दे. घरी पोचले...काय ते सामान भरलं आणि एव्हढं करून देखील अजून १५/२० मिनिटे आहेतच निघायला.
कालपर्यंत मला का कोणास ठाऊक वाटत होतं की मला शनिवारी रात्री विमानतळावर जायचंय! त्यामुळे आज संध्याकाळी करेन त्या हिशेबाने काही कामे ठेऊन दिली होती. पण लेक मला चांगली ओळखते. त्यामुळे सकाळीच फोन करून तिने चौकशी केली," काय ग, आई? कधी जाणार आहेस विमानतळावर?"
जरा माझ्या मनात मग शंकेची पाल चुकाचुकालीच. " का ग?"
" नाही, सांग न? कधी जाणार आहेस?"
"अगं, मला शनिवारी जायचंय ना?"
"आआआआईईईई! इथे ये! धपाटा घालते आता मी तुझ्या पाठीत!"
"अगं, गंमत केली! मला माहितेय. शनिवारची पहाटेची आहे ना माझी फ्लाईट?"
"ये तू! बघते तुला! हाँगकाँगला एकटीच सोडणार होतीस वाटतं मला?"
चांगलीच ओळखते माझी लेक मला!

चला मंडळी!
येते!
:)

5 comments:

भानस said...

happy journey!
काहीतरी विसरली नाहीस नं गडबडीत..... :D

रोहन चौधरी ... said...

अनघा... पटपट पोच आणि तिकडून पोस्टा कर गं... वाट बघतोय आम्ही... :)

श्रीराज said...

अनघा, वय झालं की हे व्हायचंच ;)

सौरभ said...

lol... श्रीराज +१ :D

अनघा said...

मित्रमैत्रिणींनो, ह्या तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तरच दिलं नव्हतं ना? माफी! :) धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्द्ल! Better late than never ना!! :D