नमस्कार

नमस्कार

Pages

Thursday, 5 August 2010

अगं,

विसरलीस मला?
तिने दूरवरून आपल्या जिवलग मैत्रिणीला मुकी साद घातली. पण हे काय? ती नाही थांबली. आपल्याच तंद्रीत काळोखात दूरदूर जाऊ लागली. मैत्रीण आज तिला विसरून गेली होती काय? जवळजवळ सात वर्षांची मैत्री ती विसरली होती? रोज मारलेल्या सुखदुःखाच्या गप्पा देखील विसरली? दोघींनीच मारलेल्या सुनसान रस्त्यांवरच्या चकरा विसरली?

अंधारात तीस चाळीस पावलं चालून ही पुढे आली होती. आणि मुकी साद जाणवली. ही वळली. मागे बघितलं. दूर ती उभी होती. अंधारात देखील उठून दिसणारी. खांबामागुन डोकावणारी. हिला वाटले, असे कसे टाकले मी सखीला उघड्यावर? तीच तर असते नेहेमी बरोबर...जगासमोर उभं रहाण्याआधी. कधी हमसाहमशी तर कधी ओक्साबोक्शी. त्या त्या वेळी जे असेल ते. जसे असेल तसे. हा असा एकांत कधी आणि कुठे मिळणार? एक शब्द देखील न उच्चारता स्तब्ध, फक्त ऐकून घेणारी...ही सख्खी सखी.

ही जेव्हा वळली तेंव्हा तिला खुदकन हसू आलं.... ह्या टेलीपथीचं.
इतक्या दुरून मी तुला मूक साद घातली, आणि आलीच कि नाही तुला ऐकू?

ही देखील हसली...नुकतीच बॅगेत जाऊन बसलेली किल्ली तिने बाहेर काढली.
आणि किल्लीचं बटण दाबून हिने दुरूनच स्वतःची पांढरीशुभ्र गाडी बंद केली.
इतक्या दुरून देखील तिने टाकलेला निश्वास हिला ऐकू आला.
ही हसली. आणि काळोख्या बिळातून प्रकाशाकडे नेणाऱ्या पायऱ्या चढू लागली.

7 comments:

Saurabh said...

आवड्या, एकदम आवड्या... :D
निर्जिव मूर्त गोष्टींना सजीव करुन गप्पा मारण्याच्या अमूर्त कल्पना... ऊईमां, आ सू छे... छ्या, आपल्याला चांगलं कमेंटपण देता येत नाय :(

श्रीराज said...

अनघा, हल्ली ट्रेनमध्ये मी अशाच एका मुलाला बघतो. दरवाजाच्या तिथे उभा राहून तो हसत हसत चक्क हवेशीच बोलत असतो!

अनघा said...

ए! श्रीराज! मी वेडी वाटले का रे तुला?! :)

Raindrop said...

please invite your pandhri shubra friend for lunch this saturday....tell her I am gonna treat het :)

ohhh but her food bills are already paid for by your company...ok theek hai...tell her I will come all the way from Delhi to hug her this sunday :)

अनघा said...

Hey Vandu!!! Come come come!! Come fast!!! I have not seen many movies just because you were not there, my movie partner!! :D

अनघा said...

अरे सौरभ, तुझी काहीच प्रतिक्रिया नसली की मला जाम चुकल्याचुकल्यासारखं वाटतं! आणि मला माहितेय, की मी जेव्हां रडका सूर लावते तेंव्हा तर तू पाठच फिरवलेली असते!! :D

Saurabh said...

हा हा हा... नाय नाय, आपण कधी पाठ नाय फिरवत. पण मॅटर काय आहे, त्येचा पत्त्या लागत नाय म्हणून बावरायला होतं. म्हणून तवा गुमान अस्तो आपण... तुमीच पाठ फिरवून बगा, हौत आमी पाठीशी :) एकदम श्ट्रॉन्ग, सॉल्लिड सपोर्ट हाय तुम्हाला आपला...