नमस्कार

नमस्कार

Pages

Saturday 7 August 2010

कसा गेला दिवस?

सूर्य येतजात असतो.
मग कधी दिवस चांगला जातो. तर कधी खराब.
कधी धकाधकीचा. तर कधी दिवस आरामाचा.
मनोरंजनाचा. हसता खेळता. उठताबसता.
साधा सरळ. तर गुंतागुंतीचा.
कधी स्वैपाकघरात. तर कधी शयनगृहात.
आपल्या माणसात. तर कधी जमावात.
कधी कोलाहालात. तर कधी तंद्रीत.
कधी अख्खा दिवस जातो शवासनात.
तर कधी 'माझी सॉलिड लागलीय' असे म्हणायला लावणारा.

समोरच्या इमारतीमधील सुखवस्तू सोमाणकाकांच्या तीन पोरांमधील एकही पोर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आधार द्यायला जेव्हा उभं रहात नाही तेंव्हा त्यांनी त्यांचे तरुणपणाचे दिवस नक्की कसे काढले असतील हे मला कळत नाही. त्यांचा दिवस धकाधकीचा गेला कि आला तसा गेला?

नाती म्हणजे गुंतवणूक. जशी पैश्यांची. त्याहीपेक्षा महत्वाची. एकेक दिवसाची त्यावर मेहेनत. त्यावर श्रम. त्यावर घाम. त्यासाठी जागरण. त्याची जपवणूक करावी. एकेक दिवस नात्याला वहावा.

सूर्य तर जातयेत असतो.
आपण तो नात्याला वहावा.

तर हे दिवस कारणी लागले असे म्हणताना सुरुकुतलेल्या चेहेऱ्यावर हसू आपसूकच येईल.

असं मला वाटतं.

10 comments:

Raindrop said...

mazhja changla gela diwas...me tujhyashi bolale, apan happy happy bolalo ani tu atta mala tujhya ghari rahalayala denar aahes. asa vichar kela tar changlach gela diwas.

but such mathematics of relations doesn't always result in fair equations na? sometimes some people give their all and yet realise at the end of the day ke tyancha diwas changla nahi gela...

karan the whole equation was wrong.
asa nahi ka hou shakat?

Anagha said...

Then it's about giving your best for the relation you value.... and before we put in our efforts and time, we need to be sure! About the people we will be losing all of that! But about kids? It's like 'जे पेरावं, ते उगवतं'. That's waht I feel Vandu! :)

भानस said...

" जे पेरावं ते उगवतं " या युक्तीला तडा देणारी अवलाद निपजते तेव्हां जितक्या सहजतेने बिल्वपत्रावर पाणी सोडतो तितक्या सहजतेने पोरांवर-त्यांच्यावरील मायेवर पाणी सोडायलाही जमायला हवं.

आपण जे पोरासाठी केलं त्याची परतफेड केवळ त्याने केली तर ती गुंतवणूक सार्थकी लागली असे म्हणता येईल का?

Anagha said...

परतफेड म्हणून नाही...पण जेंव्हा आपले आईबाबा त्यांच्या आईबाबांचं आणि आपलं देखील करत आहेत हे बघून तो गुण आपोआपच नाही का अंगात येत?
आपण करतो ते आपल्याला आनंद मिळतो म्हणून करतो....त्याची परतफेड मिळावी म्हणून नाही करत.... परंतु ह्याच खऱ्याखुऱ्या भावनेतूनच मग ते नातं पक्क होतं ना?
मग सोमणकाकांचं असं काय चुकलं की तिन्ही मुलं पाठ फिरवून निघून जावीत?

भानस said...

अगं सोमणकाकांच काही चुकलं नसेलच गं. जे त्यांच्या हातात होतं ते त्यांनी जीवापाड केलं.

खरं तर, सोमणकाकांची मुले करंटी... जेव्हां कळेल तेव्हां वेळ निघून गेलेली असेल आणि त्या मुलांनाही न झेपणारे ताट वाढून ठेवलेले असेल.

देर असेल पण अंधेर नक्कीच नसतो... तो पाहतोय नं... मात्र सोमणकाका-काकूंनी खंत करणे थांबवायला हवे. किमान आता तरी स्वत:साठी-फक्त एकमेकांसाठी जगायला हवे. निदान एक खंत तरी काहीशी कमी होईल.

Anagha said...

जेंव्हा एक मुल चुकतं तेव्हा म्हणू शकतो, कार्ट आपमतलबी आहे. आईबापाचे कष्ट दिसत नाहीत. परंतु जेंव्हा सगळीच असे वागतायत तेंव्हा थोडी गडबड असू शकते. नाही का? आईबाबाप देखील माणसेच असल्याकारणाने ती चुकू शकतात. :)
नाही का? :)

rajiv said...

ज्याला वडिलोपार्जित संचीतामधून उचल घेऊन खर्च करायची सवय, त्याला स्व गुंतवणुकीचे ममत्व/ महत्व कसे माहित असणार ?

उगवण्यासाठी आधी स्वतः पेरावे लागते, हे ज्यांनी कुणाला पेरताना बघितलेच नाही त्यांना कसे माहित असणार ?

शेक्सपिअर च्या `मर्चंट ऑफ व्हेनिस ' या नाटकात त्याने अजून काय वेगळे सांगितले आहे ....... !

Deepak said...

सोमण काकांची मुले जेव्हा सोमण काकांच्या वयाची होतील
तेव्हा त्यांची मुले सुद्धा त्यांच्याशी अशीच वागतील...हे चक्र असेच निरंतर फिरत राहील
आणि या चक्रातून जो बाहेर पडेल तोच खरा अभिमन्यू ( खरा पुत्र ).

सौरभ said...

(असो, आपल्याला सोमणकाकांची बॅकग्राउंड माहित नाही... so no comments, but in general...)
लहान मुलांना खेळवताना, त्यांना हवेत वर उडवतात, ते खाली येतात, त्यांना अलगद झेलतो... पण मोठ्ठ्या मोठ्ठ्या अनाठायी अपेक्षा बांधून उडवलं जातं तेव्हा पोरट्यांच परत खाली येणं जरा कठीणच असतं... ते उडतच जातात वर वर... मग परत आणण्याची धडपड व्यर्थ असते.
(अर्थात अपेक्षा करु नये असा अर्थ घेऊ नये. I don't know how relevant this comment is with the post. वाचल्यावर मनात आलं, ते लिहलं.)

Anagha said...

:D