नमस्कार

नमस्कार

Pages

Wednesday, 21 July 2010

कवाडं

रातराणी फुललेय. फांदीफांदीवर झुबक्याने. अस्ताव्यस्त पसरलेल्या झुडूपाने आपल्या सगळ्या अत्तराच्या कुप्या उघड्या टाकल्या आहेत. छोट्या छोट्या कुप्या. चिंचोळ्या चार चिमुकल्या पाकळ्या, मधोमध खोलवर दरी आणि त्यातून येणारा मादक, स्वर्गीय गंध. दरीच्या काठावर उभं राहून खोल एकटक बघत राहिलं तर तो गंध साद घालणारा. दरीत लोळण घेतली तर काय मी त्या अंतरंगात पोचेन? राणीच्या अंतरंगात? तिच्या महालात?
खेळ चार दिवसांचा. मग ह्या कुप्या निखळतील. नवीन कुप्या उघडतील. गंध तोच. वेडावणारा.
राणीचं अबाधित साम्राज्य...काळाचं गणित नसलेलं...वार्धक्य नसलेलं...

कवाडं उघडायचा अवकाश.
घमघमाट घरात घुसला. मला हसू आलं.
"राणी, ये. तुला मी कशी बाहेर ठेवेन? दाता बाहेर...अन् भिक्षुक घरात?"

4 comments:

rajiv said...

आपण आपल्या इंद्रीयांबरोबर मनाची पण कवाडे उघडायचा अवकाश, अनोख्या व अविस्मरणीय अशा अनुभूतींचा खजिनाच आपल्याला गवसू शकतो .
पण ...... करंटेपणाचा शाप पुसायचा तर आत्मज्ञान वा आपल्यासारख्या गुरुचे मार्गदर्शन आवश्यक !

Writer & Filmmaker said...

an open mind and heart...opens many invisible doors to the soul so that it can enjoy all beautiful things around. what a lovely thought :)

भानस said...

अनघे, काळ पंधरा वर्षे मागे नेलास बघ. अशीच माझी रातराणी भरभरून उमलायची अन त्या स्वर्गीय मादक गंधाने माझा आसमंत दरवळून टाकायची. तुझी ही पोस्ट वाचता वाचता मनाची कवाडे उघडली गेलीत... आता पुढचा सगळा दिवस गंधाने घमघमून जाईल. :)

श्रीराज said...

अनघा, तुझां लेख वाचून अंतर्मुख झालेल्या मनात राजीवच्या कमेंटने हास्य पेरले...म्हणजे त्याने तुला दिलेली उपाधी अगदी योग्य वाटली. खरंच गुरु आहेस तू, पण तुला तसं संबोधलं तर खर्या "गुरु"जींना काय वाटेल हा प्रश्न पडला