नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 19 July 2010

सहज जाता जाता...

गळ्यात एखादी काळी पोत असावी अशी एक काळी वायर खिडकी बाहेर लटकलेली बरेच दिवस दिसतेय. हल्ली एक मजेशीर चित्र दिसून येतं. पाऊस पडून गेल्यावर त्या काळ्या पोतीला लक्ष लक्ष सुंदर चकाकते हिरे लगडून बसतात. आणि मग तो साधा काळा दोरखंड, लाख मोलाचा होऊन जातो. हळूहळू एक एक हिरा तिथून सुटतो आणि धरतीच्या कुशीत उडी मारून जातो.
त्या दिवशी त्यावर असा एकच हिरा लटकत राहिला होता. वाहत्या वाऱ्याशी खेळत. हेलकावे घेत.
ते त्याचे हिंदोळे माझ्या कानी हलकेच पियानोचे सूर घेऊन आले.
तिथून नजर खाली वळवली तर क्षणाचा उशीर काय खेळ दाखवून जातो ते दृष्टीक्षेपात आलं. त्या हिऱ्याने वेळीच उडी मारली तर मातीत विरून जाण्याची संधी होती आणि एका क्षणाचा उशीर, मग खाली सिमेंटवर आपटून कपाळमोक्षच नशिबी. त्याने अॉलिम्पिकच्या तयारीने शर्यतीत उतरलेल्या खेळाडूप्रमाणे खिडकीत ठेवलेल्या कुंडीत झेप घेतली आणि एका क्षणात तो थेंब लाल मातीत विरून गेला.

मरण, असं कामी आलं.

8 comments:

Shriraj said...

अनघा, स्वर्गातल्या ज्या 'Creative Director'-ने तुला ही दृष्टी दिलेय त्याचे मी शतशः आभार मानतो.

Balraj said...

Sundar!

Raindrop said...

a death so glorious that plants the seeds of a new beginning :) i love the raindrop concept...it is a world in itself! The essence of it, very beautifully captured in your observation :)

Unknown said...

chan

Guru Thakur said...

अप्रतीम.....शेवटचं वाक्य मिडास ट्च.

akhalak said...

कुंडीतल्या त्या हिरव्या जीवाची प्रार्थना देवाने ऐकली असेल, अणि तो हिरा लाख मोलाचा ज्याचा साठी होता त्याला मिळाला....

Anagha said...

मित्र मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला खरंच खूप छान वाटतं...आणि अधिक लिहिण्यासाठी हुरूप येतो!
:)

Shahid Ausekar said...

Hope I could have the cam which can capture the expressions. Coz I don't have words to send u.