नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday, 29 June 2010

मैत्री

मैत्रीचं जाळं असतं....
मैत्रीचं पोळं असतं...

जाळं दूरदूर पसरतं.
मूळ विसरतं.
एका झटक्यात निखळून जातं.

पोळं मधुर असतं..
एकमेकांना धरून असतं.
कोणी आक्रमण केलं तर
डंख करून एकजात आत्मदहन करतं!

माझं नाही जाळं.
माझं आपलं छोटंसं पोळं.

जाळपोळ करण्यापेक्षा बरं!

8 comments:

Saurabh said...

हाहा... गोड कविता आहे... :)

श्रीराज said...

अनघा, काय लिहीतेस गं तू! खरंच शब्दं नाहीत माझ्याकडे!! एक मात्र नक्की तू एखादं पुस्तक लिहीलंस तर त्यातली एक प्रत मी विकत घेतलेली असेन :) God bless you.

rajiv said...

`गदिमा' यांनी एक `ळ' वापरून गाणे लिहिले होते त्याची आठवण झाली !!!!

अनघा said...

सौरभ आणि श्रीराज, तुमच्या उस्फुर्त प्रतिक्रिया वाचून मला एकदम हुरुपच येतो! मनापासून धन्यवाद! :)

रोहन चौधरी ... said...

पोळ.. जाळ.. जाळपोळ .. भारीच जुळवा-जुळवी... :) माझ्याकडचे शब्द संपत आलेत... :)

अनघा said...

राजीव, गदिमांची कुठली कविता?

संकेत आपटे said...

‘घननीळा लडिवाळा’. गदिमांना एकदा कोणीतरी म्हणालं होतं की, ‘‘ळ’ हे अक्षर फार रुक्ष आहे. या अक्षराच्या सहाय्याने बनणारे फार कमी शब्द आहेत. तेव्हा गदिमांनी ‘घननीळा लडिवाळा, झुलवू नको हिंदोळा’ हे गाणं लिहिलं.

अनघा said...

अरे व्वा! संकेत, I am impressed! तुला अगदी माहितेय हे! :)