नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 17 May 2010

औषधी नाळ...

मुंबईतल्या माणसांची नाळ, मुंबईशी कायमच जोडलेली असते असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
आमच्या घराखाली असलेल्या 'अशोक वडापाव'चे कमीतकमी वीस वडापाव तरी, तू परत कधी दुबईला येशील तेंव्हा घेऊन ये असे तिथल्या आमच्या मित्राने एकदा मला सांगितले.

हल्ली नवीन लागलेल्या शोधानुसार आईची नाळ ही त्या बाळाच्या आईवडिलांना शक्य असल्यास, जपून ठेवली जाते. त्या बाळाच्या पुढील आयुष्यात, दुर्दैवाने काही विकार जडलेच तर त्याला त्यातून बरे करण्यास, ती नाळ हे अतिशय उत्तम औषध ठरू शकते.

आपल्याला आपल्या जिवलग मुंबईपासून जर काही कारणामुळे दूर जावे लागलेच, तर मग ह्या मुंबईतल्या छोट्याछोट्या गोष्टी, ( अशोकचा वडापाव, पोलीस कँटीनचा खिमा, सिटीलाइटचे ओले बोंबील, बडे मियांची तंदुरी आणि असेच विविध प्रकार...) आईच्या नाळेचेच काम करीत असतात. मग तो जडलेला आजार हा 'होमसिक', 'गल्लीसिक', 'शाळासिक', 'मैदानसिक' किंवा अजून काहीही असू शकतो.

हे मात्र खरे की, त्या दिवशी अशोकचे ते वीस चमचमीत वडापाव, दुबई विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या माझ्या नवऱ्याच्या आणि त्त्याच्या मित्रांच्या हातात दिल्यावर, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मला त्या नाळेचीच आठवण करून गेला.

5 comments:

Anonymous said...

I am regular visitor of your blog. It is very difficult to express so many thoughts in the way you express. All your blogs touch my heart.
Pl check spell of Hindustan petroleum in your itroduction.

akhalak said...

Mansachi ek pravutti aste....je tyachya jawal aste tyachi kimmat kalat nahi, asach kahi sata samudra palikade gelyanantar chhotya chhotya goshti kiti miss karat asto ani aaplya ayushyat tya kiti molachya ahet he kalte...

Ithe sydney la barech indian restaurent ahet, pan ka ek sudha tyach sadhya wadapavwalyachi khamkhamit chav devoo shakat nahi....?

Karan mala watte tyachi mule mazya gawchya matit rutleli nastat...



Bharata baher gelyanantar lagech gharachi wyakhya badalte mag ghar mhanje maza desh hoto....

Ani mag tech mumbaitle wadapav, naley sarkhe Aushadharupane gunkari Hotat.

Anagha said...

आभार पारकर.

रोहन... said...

अशोकचा वडापाव, पोलीस कँटीनचा खिमा, सिटीलाइटचे ओले बोंबील, बडे मियांची तंदुरी ...

ह्या जागा नेमक्या कुठे आहेत ते मला कळव... मी कालच खादाडीवर एक छोटासा पोस्ट लिहिला आहे... :)

Anagha said...

रोहन,
अशोकचा वडापाव- कीर्ती कॉलेजच्या गल्लीत, दादर मध्ये.
पोलीस कँटीनचा खिमा- आमच्या कॉलेजसमोर! म्हणजे जे जे स्कूल ऑफ अपलाइड आर्टच्या इमारतीसमोर, क्रॉफर्ड मार्केटच्या बाजूला!
सिटीलाइटचे ओले बोंबील- हा तर आमचा सिटीलाइटचा मासळी बाजार!
बडे मियांची तंदुरी... रिगल सिनेमाच्या मागे!! चिकन टिक्का, कबाब!!! मस्त!!!
सकाळी सकाळी भूक लागली!! मी काही श्रावण पाळत नाही!! पण जे पाळतात त्यांची पंचाईत!! :)