नमस्कार

नमस्कार

Pages

Monday 19 April 2010

'ऊपरवाला'

समजा एक खोका आहे. चारी बाजूंनी बंद.
वरून एक झाकण आहे. आणि आत एक छोटुसा उंदीर आहे.
वरचं झाकण उघडून एक मुलगा रोज सकाळी एक चीजचा तुकडा त्या उंदरासाठी खोक्यात टाकतो.
त्या उंदारासाठी त्या दिवसाचे तेव्हढेच अन्न.
मग दिवसभर त्याने बाजूच्या भिंतींवर किती का डोके आपटले, वरच्या झाकणाला किती का धडका दिल्या तरी देखील त्या पेक्षा अधिक अन्न मिळण्याची शक्यता शून्य.
मग मला सांगा कि त्या उंदराने अधिक अन्नासाठी किती त्रास करून घ्यावा?
की आपल्याला जे मिळतंय त्यात सुखी रहावं?
म्हणजे आपल्याला जे मिळतंय कदाचित तेव्हढ्याच सुखावर आपला अधिकार असावा.
नाही का?
'उपरवाला जितना देनेवाला है उतनाही देगा.'
छप्पर फाडके 'खूप कमी वेळा' देगा!
कसे? :)

2 comments:

rajiv said...

पण तरीही त्या उंदराला खोक्यावर धडका देत राहणे भाग आहे , , नाहीतर ते बाहेरचे जग त्याला वा त्त्याच्या अस्तित्वाला विसरून जाईल व मग त्याला एकदा मिळणारा चीझचा तुकडा पण मिळणारनाही.

सागर said...

Manya pan dhadka den is must