नमस्कार

नमस्कार

Pages

Tuesday 13 April 2010

मी अपराधी..

मी एक bag घेऊन घरातून लग्न करून निघाले.
हॉल मधून निघालो तेव्हा रात्र झालेली होती..
दूरचा प्रवास. मुंबई ते डोंबिवली. लांबच लांब काळोखी रस्ता.
बाजूला नवीन नवरा.
झोप लागली तेंव्हा माझं डोकं खिडकीच्या तावदानावर आपटू नये म्हणून त्याने स्वतःचा हात तावदानावर ठेवलेला अजून आठवतं.
त्या दिवशी वयाच्या बाविसाव्या वर्षी मी स्वतःच्या सुखाची जबाबदारी नवऱ्यावर टाकली तेंव्हा हे सुख म्हणजे काय असते ते मला स्वतःला तरी कळले होते काय?
किंवा नवराच्या सुखाची जबाबदारी स्वतःवर घेतली तेंव्हा त्याचे सुख म्हणजे काय ते मला कळले होते काय?
नाही. नव्हते कळले.
मग पुढील काही वर्षांमध्ये माझी त्याच्याबद्दलच्या तक्रारींची यादी वाढली.
का?
कारण एकच.
लग्न करताना स्वतःचे सुख कशात आहे हे स्वतःच समजून न घेता त्या न कळलेल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा मोठा अपराध नव्हे काय?
Am guilty.

6 comments:

रोहन... said...

अनघा... सारखाच प्रसंग.... कुठलीशी जुनी आठवण आली... :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

खूप सुंदर लिहिलं आहे.

Nisha said...

Very true - mazya aayushyat pan tasach aahe

Anagha said...

निशा, हे असंच होतं असतं ...नाही का?
धन्यवाद, भेट दिल्याबद्दल...
येत जा अशीच...नेहेमी.

सागर said...

Sundar !!!!!!

Unknown said...

छान...